Novavax : 12 ते 17 वयोगटातील मुलंसाठी नोव्हावॅक्स लस 80 टक्के प्रभावी
नोव्हावॅक्स ही लस कोरोनावरील उपचारासाठी प्रभावी असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. 12 ते 17 वयोगटातील मुलांसाठी ही लस प्रभावी आहे.
Novavax : जगातील प्रत्येक देश कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी लसीकरणाचा आग्रह धरत आहे. भारतातही मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू आहे. नोव्हावॅक्स ही लस कोरोनावरील उपचारासाठी प्रभावी असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. 12 ते 17 वयोगटातील मुलांसाठी ही लस प्रभावी आहे. गेल्या वर्षी मे ते सप्टेंबरमध्ये अमेरिकेत डेल्टाचा प्रभाव वाढत होता, त्यावेळी 2 हजार 247 मुलांची चाचणी करण्यात आली. यानुसार कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी नोव्हावॅक्स ही लस 82 टक्के प्रभावी असल्याचे सांगितले आहे.
याबाबत यूएस बायोटेकने सांगितले की, पहिल्या तिमाहीत किशोरवयीन मुलांमध्ये या लसीच्या सर्वत्र वापरासाठी परावानगी देण्यात येणार आहे. विकास आणि उत्पादन समस्यांसह अनेक महिन्यांच्या संघर्षानंतर एक बहुप्रतीक्षित पाऊल म्हणावे लागेल. या लसीला युरोपीयन युनीयन आणि जागतिक आरोग्य संघटनेकडून अधिकृत मान्यता मिळाली आहे. यूके आणि न्यूझीलंडमध्ये प्रौढांसाठी ही लस वापरण्याची मंजुरी देण्यात आली आहे. युनायटेड स्टेट्स आणि मेक्सिकोमध्ये सुमारे 30,000 जणांनी चाचणीमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये लसीची परिणामकारकता ही 90.4 टक्के होती.
नोव्हावॅक्स या लसीचे मानवी शरीरावर इतर कोणतेही साईट इफेक्ट नसल्याची माहिती देखील दिली आहे. चाचणी केल्यानंतर हे समोर आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आमची लस जास्तीत जास्त प्रभावी असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या जगात लसीकरण वेगाने सुरू आहे. कोरोनावुरुद्धचा सामना करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांनी लसकरणकण करण्यावर भर दिला आहे. अशातच
दरम्यान, भारतातही सध्या 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरापासून भारतामध्ये कोरोना लसीकरण सुरु आहे. कोरोना महामारीला रोखण्यासाठी लसीकरण एक महत्वाचं शस्त्र ठरत आहे. भारताची पहिली मेसेंजर आरएनए Messenger RNA (mRNA) कोरोना लस जवळपास तयार झाली आहे. ही लस पुण्यात तयार झाली आहे. भारताची पहिली मेसेंजर आरएनए कोरोना लस अंतिम टप्यात आहे. ही लस पुण्यातील जेनोवा बायोफार्मास्युटिकल्स (Gennova Biopharmaceutical ) यांनी विकसीत केली आहे. पुढील काही दिवसांमध्ये ही लस वापरास येऊ शकते, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: