7 मिनिटांसाठी जग जिंकलं, Elon Musk ला मागे टाकत पठ्ठ्या सर्वात श्रीमंत बनला!
Elon Musk : टेस्ला कंपनीचे (Tesla) संस्थापक आणि सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. एलॉन मस्क यांची संपत्ती 200 बिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे.
Elon Musk : टेस्ला कंपनीचे (Tesla) संस्थापक आणि सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) यांना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखलं जाते. पण एका साध्या युट्युबरने एलॉन मस्क यांना मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला होता. हा व्यक्ती सात मिनिटांसाठी एलॉन मस्कला मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत झाला होता. युकेमधील मॅक्स फोश असे त्या व्यक्तीचे नाव आहे. मॅक्स फोशची संपत्ती टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क यांच्यापेक्षा दुप्पट झाली होती. पण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्त होण्याचा मान मॅक्सला फक्त काही मिनिटांसाठीच मिळाला. पाहूयात नेमकं काय प्रकरण आहे....
काही काळासाठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळाल्याचे मॅक्स फोशने युट्यूबवर एक व्हिडिओ पोस्ट करत सांगितले. Come at me Elon या मथळ्याखाली मॅक्स फोशने युट्यूबवर व्हिडिओ अपलोड केला आहे. ‘जर मी 10 अब्ज शेअर्ससह एक कंपनी स्थापन आणि रजिस्टर केली. तसेच गुंतवणूकदारांना 50 पाउंडला एक शेअर विकला. तर या कंपनीची किंमत 500 अब्ज पाउंड होईल. ही रक्कम एलॉन मस्क यांच्यापेक्षा जास्त आहे. तसेच यामुळे एलॉन मस्कला मागे टाकत मी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनेल.’ मॅक्स फोश याच्या या व्हिडिओला युट्यूबवर जवळपास आठ लाख जणांनी पाहिले आहे. मॅक्स फोशचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. युट्यूबवर या व्हिडिओला 61 हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. तर 1,757 जणांनी कमेंट्स केल्या आहेत.
मॅक्स फोश म्हणाला की, ‘पैसा कमवण्याची ही पद्धत कायम ठेवण्यास माझ्यावर फसवणुकीचा आरोप लावण्यात येऊ शकतो. हे चांगले नाही.’ अनलिमिटेड मनी लिमिटेड (Unlimited Money Limited.) ही कंपनी कशी बनवली, याचा खुलासाही या व्हिडिओत मॅक्श फोश याने केला आहे. मस्करीत फोश याने आपल्या कंपनीचे नाव अनलिमिटेड मनी लिमिटेड असे ठेवले. ‘युकेमध्ये कंपनीची स्थापना करणे खूप सोपे आहे. त्यासाठी एक फॉर्म भरणे अनिवार्य आहे. त्यानंतर कंपनीचे दहा अब्ज शेअर करण्याचा निर्णय घेतला, असे फोश म्हणाला.’
आपला प्लॅन स्पष्ट करताना मॅक्स फोश म्हणाला की, 10 अब्ज शेअर्ससह एक कंपनी तयार करुन रजिस्टर करण्यात आली. त्यानंतर त्यातील एक शेअर 50 पाउंडच्या किमतीने विकले. या पद्धतीने कायद्यानुसार कंपनीची किमत 500 बिलियन पाउंड होईल. अशापद्धतीने एलॉन मस्कपेक्षा श्रीमंत व्यक्ती होईल.
फसवणुकीचा आरोप -
मॅक्स फोशच्या कंपनीच्या कागदपत्राच्या आधारावर शेअरच्या विक्री किमतीनुसार मुल्यमापनासाठी पाठवण्यात आले. मुल्यमापन करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याने मॅक्सला एक पत्र पाठवले, त्यात कंपनीचे मुल्य 500 अब्ज पाउंड असल्याचे सांगण्यात आले. पण पत्रात असेही म्हटले की, इतक्या मोठ्या किमतीला कंपनी पेलू शकत नाही. कारण कंपनीचे कोणतेही उत्पादन नाही. किंवा कोणतेही प्रॉडक्ट विकले जात नाही. त्यामुळे मॉशवर फसवणुकीाचा आरोप लावण्यात आला.
सात मिनिटांच्या आनंदानंतर बंद करावी लागली कंपनी –
कंपनीच्या मुल्यमापनाचे पत्र मिळाल्यानंतर मॅक्स फोश सात मिनिटांसाठी आनंदी झाला होता. कारण, मॅक्सच्या कंपनीची किंमत 500 अब्ज पाउंड झाली होती. त्यामुळे मॅक्सने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनाही मागे टाकले होते. पण हा आनंद फक्त सात मिनिटांसाठी टिकला. कारण कंपनीचे मुल्यमापन करणाऱ्या अधिकाऱ्याने पत्रामध्ये कंपनी तात्काळ बंद करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर मॅक्सने कंपनीच्या एकमेव शेअर होल्डरसोबत बातचित केली. एका महिलेने मॅक्सच्या कंपनीचा शेअर विकत घेतला होता. महिलेने कंपनी बंद करण्याची परवानगी दिल्यानंतर मॅक्सने अनलिमिटेड मनी लिमिटेड (Unlimited Money Limited.) ही कंपनी बंद केली. सात मिनिटांसाठी मॅक्सचा आनंद गगणात मावेनासा झाला होता.