Elon Musk यांनी दान केले टेस्लाचे 5.7 अरब डॉलर्स किंमतीचे शेअर्स
Elon Musk Tesla shares : जगातील सर्वात उद्योगपती आणि टेल्सा कंपनीचे (Tesla) सीईओ इलॉन मस्क यांनी इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे तब्बल 5.7 अरब डॉलर्स किंमतीचे शेअर्स दान केले आहेत.
Elon Musk Tesla shares : जगातील सर्वात उद्योगपती आणि टेल्सा कंपनीचे (Tesla) सीईओ इलॉन मस्क यांनी इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे तब्बल 5.7 अरब डॉलर्स किंमतीचे शेअर्स दान केले आहेत. नोव्हेंबर 2021 मध्ये इलॉन मस्क यांनी एका चॅरेटीला ही देणगी दिली. अमेरिकेच्या सेक्युरिटी अँड एक्सचेंज कमिशनच्या माहितीनंतर ही माहिती समोर आली आहे.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, उद्योगपती इलॉन मस्क यांनी 19 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंर या काळात 5.7 अरब डॉलर किंमतीचे शेअर्स एका सेवाभावी संस्थेला दान केले आहेत. आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या देणगीपैकी ही एक असल्याचे बोलले जात आहे. इलॉन मस्क यांनी ही देणगी कोणत्या संस्थेला दिली आहे, याचा अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही. गेल्या वर्षाच्या अखेरीस इलॉन मस्क यांनी टेस्लाचे 16.4 अरब डॉलरचे शेअर्स अथवा टक्के टक्के भागिदारी विकली होती. ट्वि करत इलॉन मस्क यांनी ट्विटरवर पोल पोस्ट करत नेटकऱ्यांना सल्ला मागितला होता. त्यानंतर अनेकांनी होय असं उत्तर दिले होते, त्यानंतर इलॉन मस्क यांनी दहा टक्के भागिदारी विकली होती. मस्कने ही देणगी देताना म्हटलं होतं की, मला माझ्या कराचा वाटा देण्यासाठी शेअर्स विकावे लागतील. कारण मी कुठुनही रोख पगार किंवा बोनस घेत नाही.
काही तज्ज्ञांच्या मते, जर इलॉन मस्क यांनी टेस्लाचे शेअर भेट, दान केले अथवा विकल्यास कर लाभ मिळू शकतो. एखाद्या सेवाभावी संस्थेला शेअर्स दान केलेल्या शेअर्सवर कोणताही कर लागत नाही. कर वाचवण्यासाठी एलॉन मस्क यांनी आपले शेअर्स दान केले आहेत.
Elon Musk has donated $5.7 billion of Tesla shares to charity.
— Bloomberg Quicktake (@Quicktake) February 15, 2022
It is one of the biggest philanthropic donations in history https://t.co/QrElc75hQt pic.twitter.com/BprcYwutbc
अमेरिकेच्या संसदेत गोंधळ -
अमेरिकेतील संसदेत करभरण्याच्या प्रकरणावरुन गोंधळ झाला होता. अमेरिकेतील खासदार बर्नी सँडर्स आणि एलिझाबेथ वॉरेन यांनी गर्भश्रीमंत लोक कशी करचोरी करतात हा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच एलॉन मस्क, बेझोस यांच्यासारख्या श्रीमंत उद्योगपतींवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर अमेरिकेत यावर चर्चेला उधाण आलं होते. त्यानंतर इलॉन मस्क यांनी आपले शेअर्स दान केले आहेत.