![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Wardha News: वर्ध्यातील मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासाठी पात्र व्यक्तींनी पुरावे सादर करा; प्रशासनाचं आवाहन
Maharashtra News: शासनानं मराठा समाजास मराठा कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. त्यानुसार वर्धा जिल्ह्यात विभागांच्या समन्वयासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष आणि जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे.
![Wardha News: वर्ध्यातील मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासाठी पात्र व्यक्तींनी पुरावे सादर करा; प्रशासनाचं आवाहन Eligible persons submit proof for Maratha Kunbi and Kunbi Maratha caste certificate in Wardha Appeal of administration Maratha Reservation Maharashtra News Wardha News: वर्ध्यातील मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासाठी पात्र व्यक्तींनी पुरावे सादर करा; प्रशासनाचं आवाहन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/21/df2b1c50d11b48d83c6bf0d2df5d4e4b170052950240788_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maratha Reservation: वर्धा : वर्धा जिल्ह्यातील (Wardha News) मराठा-कुणबी (Maratha Kunbi), कुणबी-मराठा (Kunbi Maratha) जात प्रमाणपत्रासाठी (Caste Certificate) पात्र असलेल्या व्यक्तींकडून प्रमाणपत्रासाठी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले कागदपत्र, पुरावे मागवण्यात आले आहेत. अभिलेख तपासणीसाठी जिल्ह्यात समिती स्थापन करण्यात आली असून समितीच्या कामकाजासाठी पुराव्यांची आवश्यकता आहे.
शासनानं मराठा समाजास (Maratha Samaj) मराठा कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात विभागांच्या समन्वयासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष आणि जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे.
गठीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीस कामकाज अधिक गतीमान करण्यासाठी मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासाठी पात्र असलेल्या व्यक्तींकडे उपलब्ध असलेली कागदपत्र, पुरावे, वंशावळी, शैक्षणिक आणि महसुली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तऐवज इत्यादी जुन्या अभिलेख्यांची आवश्यकता आहे.
वर्धा जिल्ह्यातील ज्या व्यक्ती मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासाठी पात्र आहे, अशा व्यक्तींनी त्यांच्याकडे उपलब्ध वरील कागदपत्रं, पुरावे, जुनी अभिलेखे जिल्हास्तरीय समितीच्या कामकाजासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या विशेष कक्षात 21 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर या कालावधीत सादर करावे, असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीनं करण्यात आलं आहे.
46 प्रकारच्या अभिलेखांची तपासणी
जिल्हास्तरीय समितीमार्फत जिल्ह्यातील सर्व विभागांच्या 1948 पूर्वीच्या तसेच 1948 ते 1967 या कालावधीतील सर्व 46 प्रकारच्या अभिलेखांची तपासणी करण्यात येत आहे. अभिलेख्यांमध्ये कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी नोंदींचा शोध घेतला जात आहे. आपापल्या विगागाने अभिलेखे तपासणीच्या सूचना देण्यात आलेल्या आहे.
राज्यात 29 लाख नोंदी सापडल्या...
राज्यात आतापर्यंत 29 लाख 1 हजार 121 नोंदी सापडल्या आहेत. आतापर्यंत सापडेल्या नोंदींमध्ये विदर्भात सर्वाधिक नोंदी मिळाल्या आहेत. तर, ज्या मराठवाड्यापासून कुणबी नोंदी तपासण्यास सुरुवात झाली, त्याच मराठवाड्या सर्वात कमी नोंदी आढळल्या आहेत. मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये मिळून 8 कोटी 99 लाख 33 हजार 281 नोंदींपैकी कुणबी- मराठा जातीच्या 29 लाख एक हजार 121 नोंदी सापडल्या आहेत. सर्वात जास्त कुणबी नोंदी या विदर्भामध्ये सापडल्या आहेत. विदर्भात आतापर्यंत 13 लाख 3 हजार 885 नोंदी सापडल्या आहेत. राज्यात रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात कमी कुणबी नोंदी या कोकणात सापडल्या आहेत. कोकणात जवळपास साडेपाच लाख नोंदी तपासल्याानंतर सर्वात कमी 118 कुणबी-मराठा नोंदी सापडल्या आहेत. मराठवाड्यातल्या सगळ्या नोंदी नव्याच आहेत. मंत्रालयात आकडेवारी संकलीत करण्याचे काम सुरू असून, या आकडेवारीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)