Trending News : वयाच्या 70 व्या वर्षी 'तो' वाऱ्यासारखा धावला! केवळ 14 सेकंदात पूर्ण केली 100 मीटरची शर्यत
Trending News : अलीकडेच, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये 70 वर्षीय व्यक्ती 14 सेकंदांपेक्षा कमी वेळात 100 मीटर धावताना दिसत आहे.
Trending News : सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडिओ येत असतात. यातील बहुतांश व्हिडिओ प्रेरणादायी असतात. नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये 70 वर्षीय माणूस 100 मीटर शर्यतीत भाग घेताना दिसला, आश्चर्य म्हणजे त्याने 14 सेकंदांपेक्षा कमी वेळात ती शर्यत पूर्ण देखील केली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर अनेक युझर्सना प्रेरित करत असल्याचं बोलंल जातंय.
वृद्ध व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
वृद्ध व्यक्तीचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे, ज्यामध्ये 70 वर्षीय अमेरिकन माणूस मायकल किश 14 सेकंदांपेक्षा कमी वेळात 100 मीटर शर्यत जिंकताना दिसत आहे. जे पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले. मायकेल किशने 14 सेकंदांपेक्षा कमी वेळात 100 मीटरची शर्यत पूर्ण केली असून त्याच्या या पराक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Michael Kish wins Penn Relays 70-year-old 100m race in 13.47!!
— FloTrack (@FloTrack) April 28, 2022
: https://t.co/PVPuMyyitJ pic.twitter.com/Cyrn2toBDa
तो वाऱ्याच्या वेगाने धावला...
70 वर्षीय मायकेल किश वाऱ्याच्या वेगाने धावत असल्याचा व्हिडिओ फ्लोट्रॅक नावाच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये 'मायकल किशने 70 व्या वर्षी पेन रिले शर्यत जिंकली' असे लिहिले आहे. शेअर केलेला हा व्हिडिओ ट्विटरवर 1.9 दशलक्षाहून अधिक युझर्सनी पाहिला आहे.
व्हिडिओ 1.9 दशलक्षाहून अधिक युझर्सनी पाहिला
मिळालेल्या माहितीनुसार असे सांगितले जात आहे की, मायकेल किशने शोर ऍथलेटिक क्लबचे प्रतिनिधित्व केले, तर फिलाडेल्फियाच्या डॉन वॉरेनने 14.35 सेकंदात दुसरे आणि जोआकिम अकोल्टसेने 15.86 सेकंदात 100 मीटर शर्यत पूर्ण करून तिसरे स्थान पटकावले. सध्या सोशल मीडियावर मायकल किशचा स्प्रिंट रेसचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Viral : जंगलच्या राजाचा म्हशीच्या शिकारीचा प्रयत्न फसला, जीव वाचवताना पळता भुई थोडी, पाहा व्हिडीओ
- Viral Video : वासराला घाबरवणं वाघाला पडलं महाग, पुढे काय झालं तुम्हीच पाहा
- Viral Video : बिस्कीटासाठी पोपटाची कुत्र्यासोबत मस्ती, हा व्हायरल व्हिडीओ पाहिला का?
- Viral Video : पर्यटकांच्या वाहनामध्ये घुसला सिंह, अन्...