एक्स्प्लोर

Ganeshotsav 2023 : विदेशात 'या' ठिकाणी आहेत गणपतीची सुंदर मंदिरे, यंदा गणेश चतुर्थीनिमित्त जाणून 'या' काही खास मंदिरांविषयी

Famous Ganesh Temples : गणेश चतुर्थीचा सोहळा जगभरात पाहायला मिळतो. यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त आपण विदेशातील सर्वात प्रसिद्ध अशा गणपती मंदिरांविषयी जाणून घेऊयात. 

Ganeshotsav 2023 : गणपती बाप्पांचे आगमन आता लवकरच होणार आहे. बाप्पा हा सर्वांचेच आवडते दैवत. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंतचा लाडक्या अशा या बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरदार सुरू आहे. गणेश चतुर्थीचा सोहळा जगभरात पाहायला मिळतो. यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त आपण विदेशातील सर्वात प्रसिद्ध अशा गणपती मंदिराविषयी जाणून घेऊयात. 

जपान 

जपानमध्ये गणपतीला 'कांगितेन' म्हणून ओळखले जाते. जपानमधील क्योटोमध्ये एक मोठे कांगितेन मंदिर आहे. ज्याची स्थापना 1372 मध्ये सम्राट गिक्योगनने केली होती. ही देवता गणेशासारखीच आहे. या ठिकाणी गणपतीची पाच रूप चित्रित केली आहेत. येथे प्रत्येक वर्षी गणेशोत्सवानिमित्त विशेष पूजा केली जाते.  

थायलंड

थायलंडमध्ये बौद्ध धर्माच्या प्रसारापूर्वी वैदिक धर्म राजधर्म असल्याने गणेश देवता इथे लोकप्रिय होती. येथे गणपतीच्या अनेक आकर्षक आणि कलात्मक मूर्ती आहेत.

कंबोडिया 

हे ठिकाण स्थापत्य कला क्षेत्र म्हणून जगभरात ओळखले जाते. येथे सुद्धा गणपतीची स्थापना केली जाते. येथील गणपतीचे रूप आणि आकार वेगळा आहे. कंबोडियात गणपतीची कांस्यमूर्ती पाहायला मिळते.

बाली 

जमबरन या ठिकाणी गणपती सिंहासनावर बसलेला आहे. त्याच्या हातात मशाल घेतलेली मूर्ती आहे. इतर मुर्त्यापेक्षा ही मूर्ती वेगळी आहे. मूर्तीच्यी अंगावर जानव्याच्या जागी साप गुंडाळलेला दिसतो.

मलाया 

 धातू आणि दगडाने तयार केलेल्या गणेशाच्या प्रतिमा आहेत. 

जावा

जावामध्ये शिवमंदिरे अधिक असून, फक्त गणेशाची अशी मंदिरे नाहीत. शिवमंदिरांच्या आवारांमध्ये क्वचितप्रसंगी गणपतीची मूर्ती आढळते. ब्रिटिश संग्रहालयात जावातील एक पंचधातूची गणेशमूर्ती आहे. याठिकाणच्या शिवमंदीरातच गणेश मंदिराची पूजा केली जाते. 

म्यानमार 

येथे गणपतीला 'महापिएन' या नावाने ओळखले जाते. गणपती येथील लोकांचे आराध्य दैवत आहे. गणपतीच्या विविध आकार आणि प्रकारच्या अनेक मूर्ती आहेत.

नेपाळ

नेपाळमध्‍ये गणपती मंदिर तयार करताना भारताप्रमाणे पाच देवांची स्थापना करण्याची परंपरा आहे. परंतु, भारतात वेगवेगळ्या पाच देवाच्या प्रतिमा स्थापन केल्या जातात. नेपाळमध्ये गणेश प्रतिमेच्या चारही बाजूने गणपतीचीच प्रतिमा स्थापन केली जाते. त्या सर्वांची विनायक या नावाने पूजा केली जाते.

अमेरिका

 बलदेव उपाध्याय यांच्या 'पुराण-विमर्श' नावाच्या पुस्तका‍त अमेरिकेत श्री गणेश मूर्ती सापडल्याचा उल्लेख केलेला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील एका प्रसिद्ध आणि प्रमुख मंदिराबाहेरील रस्त्याला 'गणेश टेंपल स्ट्रीट' असे नाव देण्यात आले आहे. हे हिंदू मंदिर फ्लशिंग, क्वीन्स काउंटी येथे आहे. ज्याची स्थापना 1977 मध्ये झाली. 

इतर महत्वाच्या बातम्या

Ganeshotsav 2023 : गणपतीची महती आणि स्तुती, नेमका काय आहे अर्थ गणपती अथर्वशीर्षाचा?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
Indian 2 Trailer : भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणार सेनापती; कमल हासनच्या 'इंडियन 2' चा धमाकेदार ट्रेलर लाँच
भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणार सेनापती; कमल हासनच्या 'इंडियन 2' चा धमाकेदार ट्रेलर लाँच
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Niranjan Davkhare on Election : विरोधकांकडून खोटे आरोप, मात्र माझं काम मतदारांना माहिती : डावखरेTOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 26 June 2024 : ABP MajhaMahalakshmi Race Course वर थीम पार्कचा मार्ग मोकळा,120 एकर जागा BMC ला देण्यास मंजुरीMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 26 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
Indian 2 Trailer : भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणार सेनापती; कमल हासनच्या 'इंडियन 2' चा धमाकेदार ट्रेलर लाँच
भ्रष्ट व्यवस्थेशी दोन हात करणार सेनापती; कमल हासनच्या 'इंडियन 2' चा धमाकेदार ट्रेलर लाँच
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Embed widget