एक्स्प्लोर

Ganeshotsav 2023 : गणपतीची महती आणि स्तुती, नेमका काय आहे अर्थ गणपती अथर्वशीर्षाचा?

Ganeshotsav 2023 : गणरायाची आराधना करण्यासाठी म्हटल्या जाणाऱ्या गणपती अथर्वशीर्षाचा नेमका अर्थ काय ते जाणून घेऊया.

मुंबई : गणरायाच्या आगमनाची तयारी सध्या मोठ्या मंडळांपासून ते घरोघरी सुरु करण्यात येत आहे. कारण गणेशोत्सव (Ganeshostav) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.  या गणेशोत्सवात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये सामूहिक अथर्वशीर्ष हा कार्यक्रम आवर्जून योजिला जातो. पण अनेकांना या अथर्वशीर्षाचा नेमका अर्थ अजूनही माहीत नाही. तोच अर्थ आज आपण जाणून घेणार आहोत. गणपती अथर्वशीर्ष हे मूळ संस्कृत भाषेमध्ये आहे. यामध्ये गणरायाची स्तुती केली आहे. तर या अथर्वशीर्षानंतर फलश्रृती देखील म्हटली जाते. 

अथर्वशीर्षाचा नेमका अर्थ काय?

अथर्वशीर्ष म्हणजे स्थिर बुद्धी असलेले मस्तक. अथर्वशीर्षाचे पठण केल्याने मन आणि बुद्धी दोन्हीही स्थिर होण्यास मदत होते. कारण गणपती ही बुद्धीची देवता आहे. त्यामुळे अथर्वशीर्षाचं पठण केल्यानं बुद्धी स्थिर राहण्यास मदत होते. अथर्वशीर्षातील प्रत्येक श्लोकाचा जितका धार्मिक अर्थ आहे तितकाच त्याचा वैज्ञानिक अर्थ देखील आहे. अर्थवशीर्षाचा पहिलाच श्लोक हा पंचमहाभूतांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा आहे. 

अथर्वशीर्षातील श्लोकांचा अर्थ

अथर्वशीर्षाच्या दुसऱ्या श्लोकापासून गणपतीचा महिमा वर्णिला जातो. त्वमेव केवलम् कर्तासि (तूच कर्ता), त्वमेव केवलम् हर्तासी (तूच पोषण करणारा), त्वमेव केवलम् धर्तासि (तूच सृष्टीचा संहार करणारा), त्वमेव सर्वं खल्विदम् ब्रह्मासि (तूच ब्रह्मस्वरुप), त्वं  साक्षादात्माऽसि नित्यम् (तूच प्रत्यक्ष आत्मस्वरुप आहेस) अशा शब्दांमध्ये गणपतीची स्तुती करण्यात आलीये. 

अव त्वम् माम्, अव वक्तारम्, अव श्रोतारम, अव दातारम, अव धाराताम, अवानूचानमव शिष्यम, अव पश्चातात्, अव पुरस्तात्, अवोत्तरात्तात्, अव दक्षिणातात्, अव चोर्ध्वातात्, अवाधरात्तात्, सर्वोतो माम् पाहि पाहि समन्तात् या श्लोकामध्ये गणरायाकडे प्राथर्ना करण्यात आली आहे. आपल्या सर्वांचे रक्षण करण्यासाठी प्रार्थना या श्लोकामध्ये केली आहे. माझे, माझ्या आवाजाचे रक्षण करा. वेद, उपनिषदे यांचे रक्षण करा.ज्ञान घेणाऱ्या शिष्यांचे रक्षण चारही दिशांनी करा असं या श्लोकामध्ये सांगण्यात आलं आहे. 

त्वं वाङ्मयस्त्वञ् चिन्मयः,त्वम् आनन्दमयस्त्वम् ब्रह्ममयः,त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि ,त्वम् प्रत्यक्षम् ब्रह्मासि, त्वम् ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि हा श्लोक विघ्नहर्त्याला विविध उपमा देऊन त्याचे कौतुक करण्यात आले आहे. तूच चिन्मय आहेस, तूच सच्चिदानंद आहे, तूच ब्रह्म आहेस, तूच ज्ञान आणि विज्ञानाचा कर्ता आहेस असं या श्लोकामध्ये म्हटलं आहे. 

सर्वञ् जगदिदन् त्वत्तो जायते, सर्वञ् जगदिदन् त्वत्तस्तिष्ठति, सर्वञ् जगदिदन् त्वयि लयमेष्यति , सर्वञ् जगदिदन् त्वयि प्रत्येति, त्वम् भूमिरापोऽनलोऽनिलो नभः , त्वञ् चत्वारि वाव्पदानि या संपूर्ण श्लोकामध्ये गणरायाचे महात्म्य सांगितले आहे. गणरायाचा या जगाचा निर्माता आहे, तोच या संपूर्ण सृष्टीचे संरक्षण करतो, जल, भूमी, आकाश आणि वायू या सर्वांमध्ये गणराया आहे असं या श्लोकात सांगण्यात आलंय.

त्वम् गुणत्रयातीत:, त्वम् अवस्थात्रयातीत:, त्वन् देहत्रयातीतः, त्वम् कालत्रयातीत:,त्वम् मूलाधारस्थितोऽसि नित्यम्, त्वं शक्तित्रयात्मकः, त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम्, त्वम् ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वम् रुद्रस्त्वम्, इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वञ चन्द्रमास्त्वम्, ब्रह्मभूर्भुवः स्वरोम् गणराया हा सर्वांपेक्षा वेगळा आहे असं या श्लोकामध्ये म्हटलं आहे. सत्त्व, रज, तम, भूतकाळ, भविष्यकाळ, आणि वर्तमान या प्रत्येकापेक्षा गणराया हा वेगळा आहे. गणरायामध्ये  ब्रह्मा, विष्णू, रुद्र, इंद्र, अग्नि, वायू, सूर्य, चंद्र हे सर्व सामावले आहेत, असं देखील या श्लोकामध्ये म्हटलं आहे.

गणादिम् पूर्वमुच्चार्य, वर्णादिन् तदनन्तरम् ,अनुस्वारः परतरः , र्धेन्दुलसितम्, तारेण ऋद्धम्,  एतत्तव मनुस्वरूपम्, गकारः पूर्वरूपम्, अकारो मध्यमरूपम्, अनुस्वारश्चान्त्यरूपम्, बिन्दुरुत्तररूपम्,नादः सन्धानम्,  संहिता सन्धिः, सैषा गणेशविद्या,  गणक ऋषिः , निचृद्गायत्री छन्दः , गणपतिर्देवता ,  या श्लोकामध्ये ॐ गँ गणपतये नमः याचा उच्चार कसा करावा हे समजावून सांगम्यात आले आहे. यामध्ये गणाचा आधीचा उच्चार करावा. त्यानंतर गणपतीचा उच्चार करावा आणि त्याला नमन करावे असं सांगण्यात आलं आहे. 

ॐ गँ गणपतये नमः, एकदन्ताय विद्महे,  वक्रतुण्डाय धीमहि , तन्नो दन्तिः प्रचोदयात् यामध्ये विघ्नहर्त्याला नमन करण्यात आले आहे. एकदन्तञ् चतुर्हस्तम्, पाशमङ्कुशधारिणम्,रदञ् च वरदम् हस्तैर्बिभ्राणम्,  मूषकध्वजम्, रक्तं लम्बोदरं, शूर्पकर्णकम् रक्तवाससम् , रक्तगन्धानुलिप्ताङ्गम्, रक्तपुष्पैःसुपूजितम्, भक्तानुकम्पिनन् देवञ्, जगत्कारणमच्युतम्, आविर्भूतञ् च सृष्ट्यादौ, प्रकृतेः पुरुषात्परम्, एवन् ध्यायति यो नित्यं, स योगी योगिनां वरः हा संपू्ण श्लोक गणरायाचे वर्णन करतो. गणेश हा एकदंत, चार भुजाधारी आहे. त्याच्यासोबत मूषक आहे. चंदनाचा लेप त्याला लावला आहे. लाल अर्थात जास्वंदाची फुले त्याच्याजवळ आहे. तसेच जो गणरायाची नित्यभावाने पूजा करतो त्याचे देखील वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. 

नमो व्रातपतये, नमो गणपतये, नमः प्रमथपतये,नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय,विघ्ननाशिने शिवसुताय,श्री वरदमूर्तये नमो नमः गणरायाची वेगवेगळी नावं घेऊन त्याला नमन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. लंबोदर, एकदंत, विघ्नहर्ता, शिवपुत्रला आमचे नमन असं या श्लोकात म्हणण्यात आलंय.

अर्थवशीर्षाच्या अकराव्या श्लोकापासून फलश्रृती म्हणण्यास सुरुवात होते. अथर्वशीर्ष म्हणताना उच्चार हे स्पष्ट असावेत, ही काळजी घ्यावी. तसेच अथर्वशीर्ष म्हणताना एकाग्रतेने आणि शांत चित्ताने म्हणावे. त्यामुळे जर या गणेशोत्सवात तुम्ही गणरायाची आराधना कराताना अथर्वशीर्ष म्हणत असला तर त्याचा नेमका अर्थ नक्की जाणून घ्या. 

हेही वाचा : 

Ganeshotsav 2023 : सुखकर्ता अन् पालनहर्ताही! महाराष्ट्रातील अष्टविनायकांचं 'हे' वैशिष्य महितीये का? वाचा सविस्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Embed widget