Shrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बाबत आक्षेपार्ह पोस्ट, अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल
Shrikant Shinde : कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विषयी सोशल मिडियावर चुकीची पोस्ट व्हायरल करणाऱ्या अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Shrikant Shinde : कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विषयी सोशल मिडियावर चुकीची पोस्ट व्हायरल करणाऱ्या अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी पोस्ट करणाऱ्याचा शोध सुरु केला आहे. शिवसेनेच्या महिला पदाधिकार्याच्या नावाचा वापर करत ही पोस्ट करण्यात आली होती. राजकीय हेतूपोटी गैरसमज पसरविण्यासाठी ही पोस्ट करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता पोलिसांनी तात्काळ पावले उचलली आहेत.
सध्या राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेत दोन गट तयार झाले आहे. दोन्ही गटांचा तेच शिवसैनिक असल्याचा दावा आहे. राज्यात मागील 21 दिवसात घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर मुख्यमंत्री पुत्र खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी काल कल्याण पूर्व मतदार संघाचा दौरा केला . खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काल कल्याणमध्ये येऊन शिवसेना पदाधिकार्यांची बैठक घेतली. ही बैठक कल्याण पूर्व भागातील कोळसेवाडी शिवसेना शाखेत पार पडली. खासदार निघून गेले. त्यानंतर एक चुकीची पोस्ट खासदार आणि पोलिसांविषयी पसविली गेली. शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आशा रसाळ यांच्या नावाने ही पोस्ट होती.
कल्याण पूर्वेच्या मध्यवर्ती शाखेत प्रवेश करण्यात शिंदे यांना शिवसेनेच्या महिला संघटक अशा रसाळ यांनी विरोध केल्या ची पोस्ट समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती .काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोळसेवाडी पोलिसांनी रसाळ यांना पोलिस ठाण्यात बोलावून चौकशी केली. रसाळ यांनी पोस्टमध्ये कथीत केलेला प्रकार घडलेला नाही. या पोस्टशी माझा काही संबंध नाही. माझ्या नावाचा वापर करण्यात आला असल्याचे स्पष्ट केल्याची माहिती पोलिसांनी दिली . या प्रकरणात कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांनी आशा रसाळ यांच्या नावाचा वापर करीत अज्ञात व्यक्तीने ही चुकीची पोस्ट केली आहे. राजकीय हेतूने गैरसमज पसरविण्याचा उद्देशाने ही पोस्ट करण्यात आल्याचे समोर आले आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. कायदेशीर कारवाई केली जाईल असे सांगितले.