एक्स्प्लोर

Sandeep Deshpande : मोठी बातमी! संदीप देशपांडे हल्ला प्रकरणाचे ठाणे कनेक्शन? तीनजण ताब्यात

Sandeep Deshpande : संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी आता ठाणे कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

Sandeep Deshpande :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande Attack)  यांना झालेल्या मारहाणी प्रकरणाचे ठाणे कनेक्शन असल्याचे म्हटले जात आहे. पोलिसांनी आज ठाण्यातून तीन जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या कारवाईची माहिती समजताच मनसे पदाधिकारी आरोपींच्या घरी दाखल झाले.

संदीप देशपांडे यांना मुंबई येथे मारहाण झाल्याप्रकरणात आता आणखी काही सीसीटीव्ही फूटेज आणि काही व्हिडीओ देखील समोर आले आहेत. मुंबई पोलिसांनी आज शिवसेना ठाकरे गटाशी संबंधित असलेल्या दोघांना अटक केली. त्यानंतर आता, या मारहाण प्रकरणातून ठाण्यातील चिराग नगर येथून तिघांना चौकशीकरिता ताब्यात घेतले आहे. ही माहिती कळताच मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे व उपाध्यक्ष सुशांत सूर्य राव यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह त्या तिघांच्या घरी गेले. 

संदीप देशपांडे हल्ला प्रकरणाचा तपास शिवाजी पार्क पोलिसांसह गुन्हे शाखादेखील करत आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांकडून विविध तपास पथके तयार करण्यात आली आहे. पोलिसांकडून वेगाने कारवाई सुरू आहे. 

भांडुपमधून दोन जण ताब्यात

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्लाप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबईच्या भांडुप भागातून या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्र फिरवली होती. तपासासाठी विशेष पथकाची देखील नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर अखेर आज (4 मार्च) दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दोन जणांपैकी अशोक खरात हे शिवसेना महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार सेनेचे उपाध्यक्ष आहेत. ते भांडुपच्या कोकण नगर विभागाचे रहिवासी आहेत.  आज सकाळी साडेसहा वाजता गुन्हे शाखेने खरात यांना ताब्यात घेतले आहे. 

शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉक करताना झाला होता हल्ला

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉक करत असताना काल (3 मार्च) चार अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. क्रिकेट खेळताना जे स्टम्प्स वापरतात त्याद्वारे देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या चारही इसमांनी आपला चेहरा कपड्याने झाकला होता. संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉकला जातात याची आरोपींना कल्पना होती. हल्ला केल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. संदीप देशपांडे यांना थोडा मार लागला आहे. या हल्ल्याची माहिती समोर आल्यानंतर मनसैनिकांनी संताप व्यक्त केला. तर, याची माहिती समजताच शिवाजी पार्क पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पंचनामा केला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Embed widget