एक्स्प्लोर

Baba Khan: मोठी बातमी : सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बाबा खान यांच्या घराबाहेर गोळीबार, आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसांवरही फायरिंग; मुंब्रामध्ये खळबळ

Baba Khan: ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा-कौसा परिसरात सोशल मीडिया इन्फ्लुएंसर नदीम मोइनुद्दीन खान उर्फ बाबा खान यांच्या घराबाहेर गोळीबाराची धक्कादायक घटना घडली.

Baba Khan: ठाणे (Thane) जिल्ह्यातील मुंब्रा-कौसा परिसरात शनिवारी पहाटे सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि कन्स्ट्रक्शन व्यावसायिक नदीम मोइनुद्दीन खान उर्फ बाबा खान (वय 45) (Baba Khan) यांच्या घराबाहेर गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. अज्ञात हल्लेखोरांनी खान यांच्या घराबाहेर उभी असलेल्या कारवर गोळीबार करत परिसरात दहशत निर्माण केली. या प्रकरणात पोलिसांनी धाडसी कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून दोन पिस्तुले, जिवंत काडतुसे आणि मॅगझिन जप्त करण्यात आले आहेत.

Baba Khan: पहाटे घराबाहेर गोळीबार

मिळालेल्या माहितीनुसार, 7 मार्च 2026 रोजी पहाटे सुमारे 4.54 वाजण्याच्या सुमारास मुंब्रा येथील कौसा भागातील अरमान को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये गोळीबार झाल्याचा कॉल बिट क्रमांक 3 च्या पोलिसांना प्राप्त झाला. कॉल मिळताच अवघ्या पाच मिनिटांत बिट मार्शल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाहणी करून तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस सावंत यांना माहिती दिली. त्यानंतर सावंत, सपोनि सोनवणे आणि तपास पथकातील अधिकारी अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नदीम मोइनुद्दीन खान उर्फ बाबा खान यांच्या घराबाहेर उभी असलेल्या MH 03 CN 5900 क्रमांकाच्या कारवर दोन गोळ्या झाडण्यात आल्या तसेच हवेतही गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामुळे कारचे किरकोळ नुकसान झाले.

Baba Khan: आरोपीला पकडताना पोलिसांवरही गोळीबार

या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस सावंत यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गोळीबार करणारा आरोपी मुंब्र्यातील आचार गल्ली परिसरात लपून बसला आहे. त्यानुसार पोलिसांचे पथक त्या ठिकाणी पोहोचले.

पोलिसांनी आरोपीला बाहेर येण्यास सांगितले असता त्याने दोन्ही हातात पिस्तुले घेऊन पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. आरोपी भंगार गोदामातून बाहेर येत पुन्हा पोलिस आणि परिसरातील जमावाच्या दिशेने गोळीबार करू लागला. नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून पोलिसांनी संयम बाळगला.

यानंतर आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. या दरम्यान आरोपीने मागे वळून पुन्हा गोळीबार केला. या गोळीबारात जमावातील एका व्यक्तीच्या पोटात गोळी लागली तर दुसऱ्या व्यक्तीच्या हाताला दुखापत झाली. जखमी दोघांना तातडीने काळसेकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Baba Khan: धाडसी पाठलागानंतर आरोपीला अटक

पोलिसांनी पाठलाग करत अखेर आरोपीला जमिनीवर पाडून पकडले. यावेळी आरोपीच्या हातातील एक पिस्तूल खाली पडले, तर दुसऱ्या पिस्तूलमध्ये तीन जिवंत काडतुसे असताना तो पुन्हा गोळीबार करण्याच्या तयारीत होता. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत त्याच्याकडील दोन्ही पिस्तुले हिसकावून घेतली.

दरम्यान, घटनास्थळी जमलेल्या काही नागरिकांनी आरोपीला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत आरोपीला जमावाच्या तावडीतून सुरक्षित बाहेर काढले.

Baba Khan: आरोपीचा गुन्हेगारी इतिहास

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव शहाबाद उर्फ शब्बू मुन्ना शमशाद कुरेशी (वय 28) असे असून तो मुंब्र्यातील अमीन पॅलेस, महापे रोड परिसरात राहणारा आहे. प्राथमिक तपासात तो दिल्लीतील तिहार कारागृहात आठ वर्षे शिक्षा भोगून आलेला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच दिल्लीतील जाफराबाद परिसरातील चार वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये त्याच्यावर विविध गुन्हे दाखल असल्याचेही उघड झाले आहे.

आरोपीकडून पोलिसांनी दोन पिस्तुले, चार जिवंत काडतुसे आणि चार मॅगझिन जप्त केली आहेत. आरोपीने या घटनेदरम्यान सुमारे 10 ते 12 गोळ्या झाडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Baba Khan: दुसरा साथीदार फरार

या प्रकरणात आरोपीचा आणखी एक साथीदार असल्याची माहिती समोर आली असून तो सध्या फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. दरम्यान, नदीम खान यांच्या घराबाहेर पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिसरातील परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Baba Khan: या पथकाने केली कारवाई

या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस सावंत, सपोनि सोनवणे तसेच पोलीस कर्मचारी अजीज तडवी, अजिंक्य महाडिक, शिंदे, पाटोळे, आव्हाड, काकड, घुले आणि जाधव यांच्यासह इतर पोलिसांचा सहभाग होता. दरम्यान, गोळीबारामागील नेमके कारण काय होते, तसेच आरोपी आणि नदीम खान यांच्यात कोणताही वाद होता का याचा तपास मुंब्रा पोलीस सध्या करत आहेत.

आणखी वाचा 

LPG Gas Shortage: केंद्र सरकारने व्यावसायिक LPG चा गॅसपुरवठा थांबवला, देशातील हॉटेल, रेस्टॉरंट इंडस्ट्री ठप्प होण्याची भीती

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: पुणे पोलीस दलात रुजू झाल्याचे खोटे फ्लेक्स लावले; लग्नासाठी नको नको ते केले, तरुणाची भन्नाट आयडिया पडली महागात
पुणे पोलीस दलात रुजू झाल्याचे खोटे फ्लेक्स लावले; लग्नासाठी नको नको ते केले, तरुणाची भन्नाट आयडिया पडली महागात
Ashok Kharat Crime News: ठाण्यातील 'तो' वादग्रस्त सरकारी अधिकारी निघाला अशोक खरातचा कट्टर भक्त, महिलेला भोंदूबाबाच्या नाशिकमधील कार्यालयात नेलं अन्...; हादरवणारी माहिती समोर
ठाण्यातील 'तो' वादग्रस्त सरकारी अधिकारी निघाला अशोक खरातचा कट्टर भक्त, महिलेला भोंदूबाबाच्या नाशिकमधील कार्यालयात नेलं अन्...; हादरवणारी माहिती समोर
तुमच्या मुलीसोबत लग्न लाऊन द्या, अन्यथा वडिलांना जीवे मारेन; बीडमधील धक्कादायक प्रकार, गुन्हा दाखल
तुमच्या मुलीसोबत लग्न लाऊन द्या, अन्यथा वडिलांना जीवे मारेन; बीडमधील धक्कादायक प्रकार, गुन्हा दाखल
Raigad Crime news: माणगावच्या लॉजवरील तरुणीच्या मृतदेहाबाबत धक्कादायक खुलासा; प्रेमप्रकरण अन्...; आरोपीला नवी मुंबईतून बेड्या
माणगावच्या लॉजवरील तरुणीच्या मृतदेहाबाबत धक्कादायक खुलासा; प्रेमप्रकरण अन्...; आरोपीला नवी मुंबईतून बेड्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लातूर पॅटर्नचे जनक, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून शोक
लातूर पॅटर्नचे जनक, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून शोक
योगी, आपले मुख्यमंत्री तिकडे प्रचाराला जातायंत इकडे विनयभंग होतात; उद्धव ठाकरेंचा PM, CM फडणवीसांवर हल्लाबोल
योगी, आपले मुख्यमंत्री तिकडे प्रचाराला जातायंत इकडे विनयभंग होतात; उद्धव ठाकरेंचा PM, CM फडणवीसांवर हल्लाबोल
Raja Shivaji Movie: राजा शिवाजी चित्रपटाच्या ट्रेलरमधील नजर खिळवून ठेवणाऱ्या 15 फ्रेम्स, वाघनखं अन् अफजलखानाच्या वधाचा प्रसंग
राजा शिवाजी चित्रपटाच्या ट्रेलरमधील नजर खिळवून ठेवणाऱ्या 15 फ्रेम्स, वाघनखं अन् अफजलखानाच्या वधाचा प्रसंग
Pahalgam Attack Adil Shah House Eknath Shinde: पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिलं, एकनाथ शिंदेंचा फोटो देवासारखा भिंतीवर लावला!
पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिलं, एकनाथ शिंदेंचा फोटो देवासारखा भिंतीवर लावला!
तुमच्या मुलीसोबत लग्न लाऊन द्या, अन्यथा वडिलांना जीवे मारेन; बीडमधील धक्कादायक प्रकार, गुन्हा दाखल
तुमच्या मुलीसोबत लग्न लाऊन द्या, अन्यथा वडिलांना जीवे मारेन; बीडमधील धक्कादायक प्रकार, गुन्हा दाखल
Nanded Crime News: मोबाईलच्या स्टेटसवरुन पोलिसांना 'कबुतरा'चा माग काढला, नांदेडच्या अर्जितसिंह चव्हाणचा मारेकरी शाहरुखला अटक, बड्या राजकारण्यांशी कनेक्शन
मोबाईलच्या स्टेटसवरुन पोलिसांना 'कबुतरा'चा माग काढला, नांदेडच्या अर्जितसिंह चव्हाणचा मारेकरी शाहरुखला अटक, बड्या राजकारण्यांशी कनेक्शन
Amravati Video Viral : महागडे मोबाईल अन् मुलींवर उडवण्यासाठी पैशांचा हव्यास! आईचे दागिने विकून अयान अहमद पूर्ण करायचा शौक; थार गाडी मालकाचाही मोठा खुलासा
महागडे मोबाईल अन् मुलींवर उडवण्यासाठी पैशांचा हव्यास! आईचे दागिने विकून अयान अहमद पूर्ण करायचा शौक; थार गाडी मालकाचाही मोठा खुलासा
Devendra Fadnavis and Prajakt Tanpure: देवेंद्र फडणवीस फोनवर मोजून तीन वाक्य बोलले, प्राजक्त तनपुरेंना एका मिनिटात माघार घ्यायला लावली, नेमकं काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस फोनवर मोजून तीन वाक्य बोलले, प्राजक्त तनपुरेंना एका मिनिटात माघार घ्यायला लावली, नेमकं काय म्हणाले?
Embed widget