फेक न्यूजला आळा घालण्यासाठी WhatsAppचं नवं फिचर
व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी नवं फिचर घेऊन आलं आहे. या फिचरमार्फत व्हॉट्सअॅप युजर्स एखाद्या फेक न्यूजचं फॅक्ट चेक करू शकणार आहेत.
मुंबई : WhatsApp नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन फिचर्स घेऊन येत असतं. आताही व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्सच्या मदतीसाठी खास फिचर अपडेट केलं आहे. या नव्या फिचरनुसार, आता युजर्सना फेकन्यूजबाबत जाणून घेणं शक्य होणार आहे. याव्यतिरिक्त युजर्स आता 70 हून अधिक देशांतील फॅक्ट चेकर्सशी जोडले जाऊ शकतात. पॉयन्टर इंस्टीट्यूटच्या इंटरनेशनल फॅक्ट-चेकिंग नेटवर्क (IFCN)सोबत फेसबुकची मालकी असलेली कंपनी WhtsApp ने भागीदारी केली आहे. IFCN ने WhatsApp वर आपला चॅटबॉट लॉन्च केला आहे.
हे फिचर कसं करतं काम?
चॅटबॉटचा नंबर +1 (727) 2912606 हा आहे. पहिल्यांदा हा नंबर तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह करावा लागेल. चॅटबॉट सुरु करण्यासाठी 'हाय' शब्द लिहून या नंबरवर मेसेज सेंड करा. IFCN चं हे चॅटबॉट आतापर्यंत फक्त इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. दरम्यान, कंपनी चॅटबॉट लवकरच हिंदी, स्पॅनिश आणि पोर्तुगालीसह इतर भाषांमध्ये अपडेट करू शकते.
चॅटबॉटच्या मदतीने युजर्स फॅक्ट चेक करू शकतात. त्याचबरोबर कोरोना व्हायरसशी निगडीत अन्य बातम्यांबाबतही जाणून घेऊ शकतात. ही सिस्टिम युजर्सना कंटरी कोडच्या आधारावर ओळखते. दरम्यान, WhatsApp वर सर्व मेसेज अॅन्ड-टू-अॅन्ड एन्क्रिप्शनसोबत येतात. त्याचबरोबर युजर्स याबाबतची अधिक माहिती व्हॉट्सअॅपच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन मिळवू शकतात.
भारतात WhatsApp Pay होणार लॉन्च; Google Pay आणि Paytm देणार टक्कर
भारतात WhatsApp Pay होणार लॉन्च
व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी पेमेंट सर्विस आणणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून भारतात बीटा टेस्टिंग सुरु आहे. पेमेंट मेथडमध्ये येणाऱ्या काही अडचणींमुळे भारतात WhatsApp Pay अजुनपर्यंत अधिकृतपणे लॉन्च करण्यात आलं नाही. मीडिया रिपोर्टनुसार, व्हॉटसअॅप पे मे अखेरपर्यंत भारतात लॉन्च करण्यात येणार आहे. व्हॉट्सअॅपने फेब्रुवारी 2018मध्ये भारतात आपल्या UPI बेस्ड पेमेंट सर्विसची बीटा टेस्ट सुरु केली होती. भारत हा पहिला देश आहे. जिथे फेसबुकची मालकी असणारी कंपनी पेमेंट सर्विस सुरु करणार आहे. भारतातील व्हॉट्सअॅपचे युजर्स पाहता व्हॉट्सअॅप पेला भारतात उत्तम प्रतिसाद मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. व्हॉट्सअॅप देशातील डिजिटल व्यवहाराला चालना देण्यास फायदेशीर ठरणार असून ही सर्विस Google Pay आणि Paytm टक्कर देणार आहे.
संबंधित बातम्या :
Dark Mode | स्मार्टफोनमध्ये डार्क मोड यूज करणं डोळ्यांसाठी ठरू शकतं घातक!Zoom व्हिडीओ कॉलिंगला टक्कर देण्यासाठी Facebook ने लॉन्च केली नवी सर्विस
Coronavirus | अफवांवर लागणार लगाम! फेसबुक लॉन्च करणार खास फिचर