(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus | अफवांवर लागणार लगाम! फेसबुक लॉन्च करणार खास फिचर
फेसबुकवरून पसरणारी खोटी माहिती आणि अफवा रोखण्यासाठी फेसबुकने उचललं मोठं पाऊल. लॉन्च केलं नवं फिचर...
नवी दिल्ली : जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. अशातच कोरोनासंदर्भातील अनेक अफवा सोशल मीडियावर व्हायरस केल्या जातात. आता खोटी माहिती आणि अफवांवर रोख लावण्यासाठी फेसबुकने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. फेसबुक 'गेट्स द फॅक्ट' नावाचं फिचर घेऊन आलं आहे. या फिचरमुळे खोटी माहिती आणि अफवा पसरवणं थांबवण्यास मदत मिळणार आहे.
फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गने सांगितलं की, 'आम्ही मार्च महिन्यापासूनच खोटी माहिती पसरवणं थांबविण्यासाठी काम करत आहोत. आता आम्ही आमचा हा प्रयत्न प्रत्क्षात आणणार आहोत.' पुढे बोलताना मार्क झुकरबर्गने सांगितलं की, 'आम्ही फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर कोरोना व्हायरसबाबत लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवून खोट्या माहितीवर रोख लावण्याचं काम करत आहोत.'
मार्क झुकरबर्ग म्हणाला की, 'आम्ही मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच खोट्या अफवांवर रोख लावण्यासाठी काम करत आहोत. आता आम्ही जवळपास 12 देशांमध्ये 60 पेक्षा जास्त फॅक्ट चेक संस्थांसोबत एकत्र येऊन 50 भाषांमध्ये पसरणाऱ्या अफवा थांबवण्याचं काम करत आहोत. माहिती खोटी किंवा खरी असल्यास त्यावर लेबलही लावण्यात येणार आहे.'
झुकरबर्ग याबाबत माहिती देत म्हणाला की, 'आता आम्ही यामध्ये पुढे जाऊन आणखी एक फिचर आणलं आहे. आम्ही गेट्स द फॅक्ट नावाचं एक फइचर लॉन्च करणार आहोत. जे मोठ्या प्रमाणावर खोटी माहिती आणि अफवांवर लगाम लावण्याचं काम करणार आहे. फेसबुकच्या ज्या युजर्सकडे आतापर्यंत खोटी माहिती पोहोचली आहे. आम्ही त्यांना मेसेज पाठवून त्यासंदर्भातील खरी माहिती पुरवणार आहोत.'
संबंधित बातम्या :
Apple ने लॉन्च केला स्वस्त iPhone SE, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
Fact Check | कोरोना संकटामुळे तुमच्या प्रत्येक WhatsApp मेसेजवर सरकारची नजर? 5G मुळे कोरोना होतो? काय आहे या अफवेमागील सत्य#Aarogyasetu | सरकारकडून 'आरोग्य सेतु' अॅप लॉन्च, कोरोनापासून दूर राहण्यास मदत करणारं अॅप