आधार PVC कार्ड म्हणजे काय? ते किती फायदेशीर आहे? आणि कसे ऑर्डर करावे, सर्वकाही एका क्लिक वर
ऑक्टोबर 2020 मध्ये भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधार कार्डचं एक नवीन रुप सादर केलं आहे. यूआयडीएआय आता नवीन पीव्हीसी आधार कार्ड बनवित आहे.नवीन पीव्हीसी आधार कार्ड अधिक टिकाऊ आहे. हे कार्ड वॉलेटमध्ये एटीएम किंवा डेबिट कार्डसारखे सहज ठेवता येते.
![आधार PVC कार्ड म्हणजे काय? ते किती फायदेशीर आहे? आणि कसे ऑर्डर करावे, सर्वकाही एका क्लिक वर What is an Aadhaar PVC card, how to order it and how beneficial it is? Know everything here आधार PVC कार्ड म्हणजे काय? ते किती फायदेशीर आहे? आणि कसे ऑर्डर करावे, सर्वकाही एका क्लिक वर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/24221509/Aadhar.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
आजच्या काळात, आधार कार्ड सर्वात महत्वाचे कागदपत्र बनले आहे. यापूर्वी आधार कार्ड एक पेपर कार्ड होते. परंतु, भारतीय विशेष ओळख प्राधिकरणने (UIDAI) ऑक्टोबर 2020 मध्ये आधार कार्डचा नवा प्रकार सादर केला होता. ज्यानंतर यूआयडीएआय आता नवीन पीव्हीसी आधार कार्ड बनवित आहे.
PVC आधार कार्ड अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांसह येते नवीन पीव्हीसी आधार कार्ड अधिक टिकाऊ आणि कुठेही नेण्यास सोपं आहे. हे कार्ड वॉलेटमध्ये एटीएम किंवा डेबिट कार्डसारखे सहज ठेवता येते. पीव्हीसी-आधारित आधार कार्ड पूर्णपणे हवामान सुरक्षित आहे. हे कार्ड दिसायला आकर्षक असून लॅमिनेटेड आहे. पीव्हीसी-आधारित आधार कार्डावर आपल्या फोटोसह डेमोग्राफिक तपशीलांसह डिजिटली स्वाक्षरी केलेला क्यूआर कोड असतो.
पीव्हीसी मुळात एक प्लास्टिक कार्ड असते ज्यावर आधारवरील सर्व माहिती छापलेली असते. यूआयडीएआयने नागरिकांच्या सोयीसाठी आधार पत्र, आधार आणि ई-आधारसारख्या आधारचे विविध प्रकार सादर केले आहेत. आधारचे सर्व प्रकार ओळख पुरावा म्हणून ओळखले जातात. एक भारतीय नागरिक आपल्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारचे आधार निवडू शकतो.
UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवरून करा ऑर्डर आधार PVC कार्ड ऑर्डर करणे खूप सोपे आहे. यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in किंवा resident.uidai.gov.in वर आपला आधार नंबर, व्हर्च्युअल आयडी किंवा नावनोंदणी आयडी वापरुन आणि 50 रुपये शुल्क भरून हे करता येते. एकदा अर्ज केल्यास आधार पीव्हीसी कार्ड पोस्टद्वारे नोंदणीकृत पत्त्यावर पाठवले जाते.
आधार पीव्हीसी कार्डची मागणी करण्यासाठी या Steps फॉलो करा
- सर्व प्रथम, यूआयडीएआय वेबसाइटवर जा आणि 'My Aadhaar' विभागात क्लिक करा. यानंतर, Order Aadhaar PVC Card वर क्लिक करा.
- यानंतर, आपल्याला आधारचा 12 अंकी क्रमांक किंवा 16 अंकी व्हर्च्युअल आयडी किंवा 28 अंकांचा आधार नोंदणी आयडी प्रविष्ट करावा लागेल.
- आता आपल्याला त्यात सुरक्षा कोड किंवा कॅप्चा कोड भरावा लागेल आणि ओटीपीसाठी सेंड ओटीपी वर क्लिक करा.
- यानंतर, दिलेल्या जागेत नोंदणीकृत मोबाईलवर प्राप्त ओटीपी भरा आणि सबमिट करा.
- आता आधार पीव्हीसी कार्डचे प्रीव्यू आपल्या समोर असेल.
- खाली दिलेल्या पेमेंट पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर पेमेंट पेजवर जा, तुम्हाला येथे 50 रुपये शुल्क भरावे लागेल.
- पेमेंट झाल्यावर आपल्या आधार पीव्हीसी कार्डची ऑर्डर प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, यूआयडीएआय आधार प्रिंट करुन पाच दिवसांच्या आत भारतीय पोस्टला पाठवेल. जिथून हे आधार पीव्हीसी कार्ड स्पीड पोस्टद्वारे आपल्या नोंदणीकृत पत्त्यावर पोहोचेल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)