(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vivo ने लॉन्च केला 'या' सीरीजचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन, किंमत किती माहित आहे?
या स्मार्टफोनमध्ये 8 GB रॅमसह 128 GB इंटरनल मेमरी आहे. फोनची अंतर्गत मेमरी मायक्रोएसडी कार्डने 1TB पर्यंत वाढवता येते.
Vivo New Smartphone : Vivo ने भारतात आपल्या नवीन V सीरिजमधील आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. बाकी V सीरीज स्मार्टफोनच्या तुलनेत हा स्मार्टफोन सर्वात स्वस्त आहे. येथे आम्ही तुम्हाला Vivo च्या नवीन Vivo V23e 5G स्मार्टफोनचे फीचर्स आणि किंमतीबद्दल माहिती देणार आहोत. कंपनीने या स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट लाँच केला आहे. हा स्मार्टफोन मिडनाईट ब्लू आणि सनसाईन गोल्ड या दोन कलरमध्ये खरेदी केला जाऊ शकतो.
काय आहेत याचे फीचर्स ?
फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये 8 GB RAM सह 128 GB इंटर्नल मेमरी आहे. या मोबाईलमध्ये 4 GB पर्यंत विस्तारित रॅम देण्यात आली आहे. फोनची अंतर्गत मेमरी मायक्रोएसडी कार्डने 1TB पर्यंत वाढवता येते. फोनच्या स्पीडसाठी यामध्ये MediaTek Dimension 810 चिपसेट देण्यात आला आहे.
Vivo V23e 5G मध्ये 6.44-इंचाचा HD डिस्प्ले आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये प्राथमिक कॅमेरा 50 मेगापिक्सल्सचा आहे, तर एक कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा आणि दुसरा कॅमेरा २ मेगापिक्सल्सचा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 44-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर हा ड्युअल सिम स्मार्टफोन आहे आणि 5G नेटवर्क सपोर्टसह येतो. हा फोन Google च्या Android 12 वर बेस ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 4050mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फोन फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. कंपनीचा दावा आहे की ते फक्त 30 मिनिटांत 69 टक्के चार्ज होते. त्याची किंमत 25,990 रुपये आहे. हा स्मार्टफोन Xiaomi 11i 5G शी स्पर्धा करेल.
महत्वाच्या बातम्या :
- 6GB रॅम आणि तीन कॅमेऱ्यांसह 'हा' स्मार्टफोन भारतात लाँच, बजेटफ्रेंडली किंमतीसह जाणून घ्या भन्नाट फीचर्स
- 'या' कंपनीकडून नवीन 5G स्मार्टफोन कायमचे बंद होणार, कंपनीने सांगितलं "प्लॅन डेड"!
- Instagram New Feature : Instagram यूजर्ससाठी खुशखबर, लवकरच येणार ट्विटरशी जोडणारे नवीन फीचर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha