एक्स्प्लोर

Twitter : नाव बदलल्यावर ब्लू टिक 'गायब', ट्वीट एडिट होणार; ट्विटरवर आजपासून 'हे' बदल

Elon Musk Relaunch Twitter Blue : ट्विटवरील ब्लू टिक सबस्क्रिप्शन आजपासून सुरु होणार आहे. यासोबतच ट्विट एडिट बटणासह इतर फिचर्सही लाँच करण्याची शक्यता आहे.

Twitter Blue Subscription : मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर (Twitter) आजपासून पुन्हा एकदा ट्विटर ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवा (Twitter Blue Subscription) सुरु करणार आहे. आज Twitter Blue रिलाँच करण्यात येणार आहे. यासोबतच ट्विटर एडिट फिचर (Tweet Edit Button) आणि इतर अनेक फिचर लाँच करण्याची शक्यता आहे. ट्विटर एडिट बटण (Tweet Edit Feature) लाँच करणार आहे. यामुळे आता तुम्हांला तुमचं ट्विट एडिट करता येणार आहे. यासोबतच ट्विटर इतरही अनेक बदल करणार असल्याचं रिपोर्टनुसार सांगण्यात येत आहे. 

ब्लू टिक सबस्क्रिप्शन आजपासून सुरु होणार

ट्विटर कंपनीने सांगितलं आहे की, ट्विटर सोमवारी 12 डिसेंबरला ब्लू टिक सेवा पुन्हा सुरु करणार आहे. या सेवेसाठी दरमहा आठ डॉलर (सुमारे 659 रुपये) शुल्क आकारण्यात येईल. दरम्यान अँड्रॉईड (Android) युजर्सच्या तुलनेत आयफोन युजर्ससाठी (iOS User) ब्लू टिक सेवा महाग असणार आहे. आयफोन (iPhone) युजर्ससाठी ब्लू टिक सबस्क्रिप्शनसाठी दरमहा 11 डॉलर (सुमारे 907 रुपये) शुल्क आकारण्यात येणार आहे.

नाव बदलल्यावर ब्लू टिक 'गायब'

ट्विटर युजर्सने त्यांच्या प्रोफाईलवरील नाव किंवा फोटो बदलल्यास त्यांच्या अकाऊंटवरील ब्लू टिक काढून टाकण्यात येईल. मात्र, पुन्हा पडताळणी केल्यानंतर पुन्हा युजरला ब्लू टिक मिळेल. यासोबतच ट्विटरने वाढती स्पर्धा पाहता आणखी काही फिचर जोडण्याची संकल्पा आखली आहे. यानुसार, आता तुम्हांला इंस्टाग्राम आणि फेसबुकप्रमाणे ट्विटरवरही कंटेंट शेअर करता येणार आहे. यानुसार, तुम्ही ट्विटवर 1080p पर्यंतचे व्हिडिओ देखील अपलोड करू शकाल.

ब्लू, ग्रे आणि गोल्डन टिकचा पर्याय

ट्विटरने घोषणा केली होती की, ट्विटरवरील ब्लू टिकसाठी (Blue Tick) वेगवेगळे पर्याय देण्यात येणार आहेत. अधिकृत तसेच सरकारी ट्विटर अकाऊंटसाठी राखाडी रंगाचा (Grey) ऑफिशियल टॅग (Official Tag) देण्यात येईल. कंपनी किंवा ग्रुपच्या अकाऊंटसाठी ट्विटर अकाऊंटसाठी सोनेरी रंगाची टिक (Golden Tick) देण्यात येईल. ब्लू टिक युजरने नाव, प्रोफाईल फोटो, किंवा माहिती बदलल्यावर ब्लू टिक गायब होईल. त्यानंतर पुन्हा व्हेरिफिकेशन केल्यावर ब्लू टिक परत मिळेल. ब्लू टिक सबस्क्रिप्शनसाठी दरमहा आठ डॉलर शुल्क आकारण्यात येईल.

 

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election Result LIVE:
Gokul Election Result LIVE: "तुमच्या पोराबाळांना निवडून आणण्यासाठी आम्ही शपथ घ्यायची का?" मतदाराने नेत्यांना फटकारलं; गोकुळ निवडणुकीच्या मतपेटीत सापडली चिठ्ठी!
Rana Suryavanshi Attack Baramati Crime: मुंबईत टायगर श्रॉफवर हल्ला झाला त्याचवेळी महाराष्ट्रातील तरुण उद्योजक मृत्यूच्या दाढेतून वाचला, बारामतीत नेमकं काय घडलं?
मुंबईत टायगर श्रॉफवर हल्ला झाला त्याचवेळी महाराष्ट्रातील तरुण उद्योजक मृत्यूच्या दाढेतून वाचला, बारामतीत नेमकं काय घडलं?
Gokul Election Result LIVE: गोकुळच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग? सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीने महायुतीचा घाम फोडला?
Gokul Election Result LIVE: गोकुळच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग? सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीने महायुतीचा घाम फोडला?
Tiger Shroff Car Firing Marathi News: पानिपतचा मूळ रहिवाशी, डंकी रुटने अमेरिकेत पोहोचला; टायगर श्रॉफच्या गाडीवर हल्ला घडवून आणणारा अनिल पंडीत नेमका कोण?
पानिपतचा मूळ रहिवाशी, डंकी रुटने अमेरिकेत पोहोचला; टायगर श्रॉफच्या गाडीवर हल्ला घडवून आणणारा अनिल पंडीत नेमका कोण?

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election Result LIVE:
Gokul Election Result LIVE: "तुमच्या पोराबाळांना निवडून आणण्यासाठी आम्ही शपथ घ्यायची का?" मतदाराने नेत्यांना फटकारलं; गोकुळ निवडणुकीच्या मतपेटीत सापडली चिठ्ठी!
Rana Suryavanshi Attack Baramati Crime: मुंबईत टायगर श्रॉफवर हल्ला झाला त्याचवेळी महाराष्ट्रातील तरुण उद्योजक मृत्यूच्या दाढेतून वाचला, बारामतीत नेमकं काय घडलं?
मुंबईत टायगर श्रॉफवर हल्ला झाला त्याचवेळी महाराष्ट्रातील तरुण उद्योजक मृत्यूच्या दाढेतून वाचला, बारामतीत नेमकं काय घडलं?
Gokul Election Result LIVE: गोकुळच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग? सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीने महायुतीचा घाम फोडला?
Gokul Election Result LIVE: गोकुळच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग? सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीने महायुतीचा घाम फोडला?
Tiger Shroff Car Firing Marathi News: पानिपतचा मूळ रहिवाशी, डंकी रुटने अमेरिकेत पोहोचला; टायगर श्रॉफच्या गाडीवर हल्ला घडवून आणणारा अनिल पंडीत नेमका कोण?
पानिपतचा मूळ रहिवाशी, डंकी रुटने अमेरिकेत पोहोचला; टायगर श्रॉफच्या गाडीवर हल्ला घडवून आणणारा अनिल पंडीत नेमका कोण?
Satara Politics: पुणे पदवीधरवरून साताऱ्यात राजकीय वातावरण तापलं; शिवसेनेच्या नाराजीनंतर भाजपमध्येही आलबेल नसल्याची चर्चा? नेत्यांची अनुपस्थिती अन् बोलणे टाळलं, नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरवरून साताऱ्यात राजकीय वातावरण तापलं; शिवसेनेच्या नाराजीनंतर भाजपमध्येही आलबेल नसल्याची चर्चा? नेत्यांची अनुपस्थिती अन् बोलणे टाळलं, नेमकं काय घडलं?
Tiger Shroff Car Attack: टायगर श्रॉफवर हल्ला केल्यानंतर शुटर्सनी काय केलं, स्टार्ट टू एंड चोख प्लॅनिंग, लोकल ट्रेनचा वापर, नेमकं काय घडलं?
टायगर श्रॉफवर हल्ला केल्यानंतर शुटर्सनी काय केलं, स्टार्ट टू एंड चोख प्लॅनिंग, लोकल ट्रेनचा वापर, नेमकं काय घडलं?
Jalgaon Accident News: जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, नातेवाईकाला सोडण्यासाठी गेले अन्..., नात्यातील तिघांचा दुर्दैवी अंत
जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, नातेवाईकाला सोडण्यासाठी गेले अन्..., नात्यातील तिघांचा दुर्दैवी अंत
Gokul Election Result LIVE: सतेज पाटील घामटा काढणार की महायुतीचा अंगारा, भंडारा अन् शपथा कामाला येणार? क्राॅस व्होटिंग सुद्धा खेळ बिघडवणार??
Gokul Election Result LIVE: सतेज पाटील घामटा काढणार की महायुतीचा अंगारा, भंडारा अन् शपथा कामाला येणार? क्राॅस व्होटिंग सुद्धा खेळ बिघडवणार??
Embed widget