(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Twitter : एलॉन मस्कना विरोध करणाऱ्यांना गमवावी लागली नोकरी, ट्विटर आता आणखी कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत
Twitter Layoff : गेल्या आठवड्यात 50 टक्के नोकरकपात केल्यानंतर ट्विटरचे मालक एलॉन मस्क आता आणखी कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करणार आहेत.
Twitter Layoff : मायक्रो ब्लॉगिंग कंपनी आणि आघाडीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी ( Social Media Platform ) एक असलेल्या ट्विटर ( Twitter ) कंपनीची मालकी एलॉन मस्क ( Elon Musk ) यांच्याकडे आल्यापासून दररोज नवनवीन निर्णय घेण्यात येत आहेत. जगातील श्रीमंत व्यक्ती आणि ट्विटर कंपनीचे नवे मालक एलॉन मस्क यांनी गेल्याच आठवड्यात 50 टक्के नोकरकपात केली. त्यानंतर आता पुन्हा मस्क आणखी कर्मचाऱ्यांना कामावरून हटवण्याच्या तयारीत आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, एलॉन मस्क पुन्हा एकदा कर्मचारी कमी करण्याच्या विचारात आहेत. मस्क यांनी कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम ( Ultimatum ) दिल्यानंतर मोठ्या संख्येनं कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे कंपनीच्या कामावरही परिणाम झाला आहे.
मस्क यांच्या अल्टिमेटमनंतर अनेक कर्मचाऱ्यांचा राजीनामा
मस्क यांनी ट्विटरची मालकी मिळताच अनेक उच्च पदांवरील अधिकारी आणि कंत्राटी कामगारांना कामावरून काढलं. यानंतर बहुतेक कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला. यानंतर मस्क यांनी कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम देत कामावर राहायचं की राजीनामा द्यायचा हे ठरवा, असा अल्टिमेटम देत ई-मेल केला. यामध्ये कर्मचाऱ्यांना कंपनीचे नवे नियम स्वीकारण्याचा किंवा राजीनामा द्यावा असं सांगण्यात आलं होतं. या अल्टिमेटम नंतर अनेक कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला. एलॉन मस्कच्या वर्क अल्टिमेटमनंतर जवळपास 1,200 कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला. ट्विटर कंपनी त्यांची अनेक कार्यालये बंद ठेवावी लागली.
Elon Musk is now considering firing more Twitter employees, this time targeting the sales and partnership groups, sources say. Meanwhile, Musk has reinstated former President Donald Trump's account. @SuKeenanTV reports https://t.co/anMsZIURU4 @BloombergTV pic.twitter.com/6twhp6ZgYd
— Bloomberg (@business) November 21, 2022
सोमवारपर्यंत ट्विटरची कार्यालये बंद
न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, मस्क यांनी कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम देण्याआधी आणि त्यानंतरही ट्विटरच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला. यानंतर ट्विटर कंपनीने कार्यालयीन इमारती सोमवारपर्यंत बंद ठेवणार असल्याचं सांगितलं. सोमवारपर्यंत ट्विटर कंपनी राजीनामा दिलेल्या कर्मचारी इमारतीतील प्रवेशासाठी असलेल्या बॅजची परवानगी काढून टाकेल. तोपर्यत ऑफीसं बंद ठेवण्यात येतील.