ठरलं! 'या' दिवशी भारतात OnePlus 8T लॉन्च होणार
एप्रिलमध्ये जागतिक पातळीवर लॉन्च करण्यात आलेल्या OnePlus 8 ने मिळवलेल्या लोकप्रियतेनंतर आता कंपनी OnePlus 8T लॉन्च करणार आहे. कंपनीने एका प्रेस नोटमार्फत या स्मार्टफोनची लॉन्चिंग डेट रिलीज केली आहे.
मुंबई : भारतात OnePlus 8T लवकरच लॉन्च करण्यात येणार आहे. 14 ऑक्टोबर रोजी आगामी वन प्लस 8टी भारतात लॉन्च होणार आहे. चिनी कंपनीने सोमवारी एक प्रेस नोट जारी करत यासंदर्भात माहिती दिली. एप्रिलमध्ये ग्लोबल लेव्हलवर लॉन्च करण्यात आलेल्या OnePlus 8 ने मिळवलेल्या लोकप्रियतेनंतर आता कंपनी OnePlus 8T लॉन्च करणार आहे. या नव्या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865+ प्रोसेसर आणि आउट-ऑफ-द-बॉक्स अॅन्ड्राइड 11 देण्यात आल्याचं बोलंलं जात आहे. तसेच OnePlus 8 च्या तुलनेत OnePlus 8T च्या डिझाइनमध्ये अनेक बदल केले जाऊ शकतात.
भारतात OnePlus 8T च्या लॉन्चिंग डिटेल्स
भारतात OnePlus 8T चं लॉन्चिंग एका ऑनलाइन स्ट्रीमच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. जे OnePlus India च्या वेबसाइटवर 14 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल. अॅमेझॉनने मायक्रोसाइट तयार करून नव्या स्मार्टफोन उपलब्ध होणार असल्याची माहिती आधीच दिली आहे. दरम्यान, हा स्मार्टफोन OnePlus.in सोबतच ऑफलाइन रिटेल स्टोअर्सवरही उपलब्ध होणार आहे.
The next addition to the OnePlus line up is ultra smooth, ultra fast and all things extreme. And, #UltraStopsAtNothing.
Get ready for the #OnePlus8T5G Get Notified: https://t.co/faf4p8m1jC pic.twitter.com/wolJ7RreB9 — OnePlus India (@OnePlus_IN) September 21, 2020
पहिल्यांदा देण्यात येणार नवे फिचर्स
आधी हा फोन भारतीय बाजारात सप्टेंबरमध्ये लॉन्च करण्यात येणार असल्याचं बोलंल जात होतं. परंतु, कोरोना व्हायरस महामारीमुळे लॉन्चिंग पुढे ढकलण्यात आली. वन प्लसचे फाउंडर आणि सीईओ Pete Lau यांनी सांगितलं की, OnePlus 8T सोबतच आम्ही काही नवीन फिचर्स इंट्रोड्यूस करण्यासाठी उत्सुक आहोत. मला पूर्ण विश्वास आहे की, स्मार्टफोन पुन्हा एका कल्पनेपेक्षा नक्कीच अधिक उत्तम असेल आणि युजर्सना एक उत्तम अनुभव घेता येईल.
OnePlus 8T चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
OnePlus 8T फोनमध्ये 6.55-इंच फुल-एचडी + डिस्प्ले आणि एक 120Hz रिफ्रेश रेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचसोबत हा फोन अॅन्ड्राइड 11 वर आधारित OxygenOS 11 वनप्लस 8टी फोन सुरु राहिल. ऑक्टा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865+ प्रोसेसर आणि 12 जीबीपर्यंतचा रॅम असू शकतो. 25 जीबी ऑन बोर्ड स्टोरेज ऑप्शन मिळू शकतो.
यामध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर आणि 16 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-अँगल शूटर आहे. फ्रंटमध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेंसर असण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त यामध्ये 4,500mAh बॅटरी, 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत मिळू शकते.
या फोनसोबत स्पर्धा
आसूस कंपनी आपल्या Zenfone 7 सीरीजमधील Zenfone 7 आणि Zenfone 7 Pro स्मार्टफोन तायवानमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. आसूसचे दोन्ही स्मार्टफोन लवकरच भारतात खरेदी करण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. भारतात आसूस Zenfone 7 सीरीजची किंमत 50 हजार रुपयांपासून सुरू होऊ शकते. आसूसने आपल्या Zenfone 7 सीरीजमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 800 सीरीजचे प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. याचसोबतच दोन्ही स्मार्टफोनमध्ये 30W ची फास्ट चार्जिंगसोबत 90Hz चा रिफ्रेश रेट असणारा एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :