एक्स्प्लोर
Advertisement
15 मिनिट चार्जिंगमध्ये 482 किमीचा प्रवास, लवकरच स्कोडाची नवी कार
नवी दिल्ली : जर डिझेल आणि पेट्रोलच्या खर्चामुळे त्रस्त झाला असाल, तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. प्रसिद्ध स्कोडा कंपनी लवकरच एक जबरदस्त एसयूव्ही कार लॉन्च करणार आहे. या कारचं वैशिष्ट्य म्हणजे, पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर ही एसयूव्ही बॅटरीवर चालणार आहे.
फॉक्सवेगनच्या एमईबी बॅटरी प्लॅटफॉर्मवरच स्कोडाच्या एसयूव्हीची निर्मिती केली जाणार आहे. स्कोडासोबत फॉक्सवेगन कंपनीही आगामी काळात प्रीमियम आणि हाय परफॉर्मन्स इलेक्ट्रिक कार बाजारात आणू शकते.
स्कोडाच्या आगामी इलेक्ट्रिक कारबाबत अद्याप संपूर्ण माहिती समोर आली नाही. मात्र, एमईबी प्लॅटफॉर्मवर तयार होणाऱ्या ही एसयूव्ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर तिची ड्रायव्हिंग रेंज 482 किलोमीटर असू शकते. पूर्ण चार्ज होण्यासाठी 15 मिनिटांता अवधी लागेल. गाडीच्या केबिनमध्येही अधिक जागा असेल, अशीही माहिती मिळते आहे.
वशेष म्हणजे पेटोल-डिझेल कारच्या किंमतींपेक्षा या एसयूव्हीची किंमत कमी असेल. स्कोडा कंपनी 2020 साली ही एसयूव्ही लॉन्च करणार असून, 2025 सालापर्यंत 30 नव्या इलेक्ट्रिक आणि हायब्रिड कार आणण्याच्या विचारत स्कोडा कंपनी आहे. 2019 पर्यंत स्कोडा सुपर्ब नव्या कोडिएक एसयूव्हीचे हायब्रिड व्हर्जन आणणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement