एक्स्प्लोर
रिलायन्स जिओची नवी ऑफर, 509 रुपयात तब्बल 224GB डेटा!

मुंबई: रिलायन्स जिओनं आपल्या यूजर्ससाठी एक नवी ऑफर आणली आहे. ही ऑफर जिओफाय ग्राहकांना मिळणार आहे. जिओ वायफाय यूजर्सला यापुढे 509 रुपयात तब्बल 224 जीबी डेटा मिळणार आहे.
ग्राहकांना जिओच्या वेबसाइटवरुन 1999 रुपयाचं जिओफाय वाय-फाय राउटर खरेदी करावं लागणार आहे. तसेच यासोबत एक सिमही विकत घ्यावं लागणार आहे. या सिमवर 99 रुपयाचं रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला प्राइम मेंबरशिप मिळेल. यानंतर देण्यात आलेल्या प्लाननुसार तुम्ही रिचार्ज करु शकता.
जिओ-फायवर कोणकोणत्या ऑफर?
जिओची ही ऑफर मिळविण्यासाठी जिओफाय राउटरमधील सिमवर 99 रुपये रिचार्ज करावं लागेल.
यासाठी आता 4 प्लान देण्यात आले आहेत. ज्यापैकी कोणताही एक आपण निवडू शकता.
- 149 रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला दर महिन्याला 2 जीबी डेटा मिळणार आहे. यासाठी 99 रुपयांसोबत 149 रुपयाचं रिचार्ज केल्यानंतर वर्षभरासाठी 24 जीबी डेटा मिळेल.
- यानंतर 309 रुपयांच्या प्लान आहे. ज्यामध्ये 6 महिनांपर्यंत दररोज 1 जीबी डेटा मिळणार आहे. ही ऑफर तुम्हाला 6 रिचार्जवर मिळेल. म्हणजे या ऑफरमध्ये तुम्हाला 168 जीबी डेटा मिळणार आहे. यासाठी 99 रुपयांसोबत 309 रुपये रिचार्ज करावं लागणार आहे.
- तिसऱ्या प्लानमध्ये 509 रुपयात ग्राहकांना दररोज 2 जीबी डेटा मिळणार आहे. 28 दिवसाच्या सायकलप्रमाणे 4 रिचार्ज सायकलवर 224 जीबी डेटा मिळणार आहे.
- चौथ्या प्लानमध्ये 999 रुपयात 56 दिवसांसाठी 120 जीबी डेटा मिळणार आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
यवतमाळ
व्यापार-उद्योग
क्रीडा
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement


















