(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Realme GT Neo 2 : रिअलमी जीटी निओ 2 लवकरच भारतात लॉन्च होणार, काय आहेत फीचर्स?
Realme GT हा स्मार्टफोन - 8GB+128GB, 8GB+256GB आणि 12G+256GB या तीन स्टोरेज वेरिएंटमध्ये उपलब्ध होईल
नवी दिल्ली : स्मार्टफोन ब्रँड Realme ने अलीकडेच चीनमध्ये Realme GT हा स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनी लवकरच हा फोन भारतीय बाजारपेठेत सादर करण्यासाठी सज्ज आहे. रिअलमी इंडिया, युरोप आणि लॅटिन अमेरिकाचे सीईओ माधव शेठ यांनी जीटी निओ 2 कंपनीच्या सर्वात मोठ्या बाजारपेठेत म्हणजेच भारतात ऑक्टोबरमध्ये लॉन्च होईल याची पुष्टी केली आहे. हा स्मार्टफोन - 8GB+128GB, 8GB+256GB आणि 12G+256GB या तीन स्टोरेज वेरिएंटमध्ये उपलब्ध होईल
क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 5G सपोर्टेड
Realme GT हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 5G मोबाइल प्लॅटफॉर्मद्वारे सपोर्टेड आहे. हा स्मार्टफोन 120Hz सॅमसंग E4 AMOLED डिस्प्लेसह सुसज्ज आहे आणि त्याची 1300 निट्सची चमक आणि 5,000,000: 1 पर्यंत कलर कॉन्ट्रास्ट रेशो आहे.
65W सुपरडार्ट चार्जिंग सपोर्ट
कंपनीने यापूर्वी म्हटले होते की, Realme ने आपल्या Realme GT लाइनअपमध्ये 5000 mAh ची बॅटरी पॅक सादर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 65W सुपरडार्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी बॅटरी या मोबाईलमध्ये दिली आहे. त्यामुळे मोठ्या बॅटरीसह Realme GT Neo 2 पूर्ण दिवस बॅटरी लाईफ देतो असा दावा कंपनीने केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Automatic Cars : ऑटोमॅटिक कार चालवताना 'या' चुका टाळा, फायदा होईल
- Amazon Great Indian Festival : अमेझॉन ग्रेट इंडियन सेलमध्ये बहुप्रतिक्षित Samsung M52 उपलब्ध होणार
- Tips : Whatsapp च्या ढिगभर मेसेजमध्ये हवा तो मॅसेज सेव्ह करा एका क्लिक वर!
- स्मार्टफोन वापरताय? मग सावधान! मोबाईल अॅप तुमच्यावर पाळत ठेवतायंत
- iQOO Z5 Smartphone : 120Hz रिफ्रेश रेटचा डिस्प्ले अन् 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट, iQOO Z5 चा नवाकोरा स्मार्टफोन लॉन्च