Automatic Cars : ऑटोमॅटिक कार चालवताना 'या' चुका टाळा, फायदा होईल
ऑटोमॅटिक कारमध्ये न थांबता रिव्हर्स गिअर टाकल्याने गिअरबॉक्समध्ये बिघाड होऊ शकतो. तसेच ट्रॅफिक लाईटमध्ये असताना ऑटोमॅटिक कारला न्युट्रल मोड ऐवजी ड्राइव्ह मोडमध्ये ठेवून ब्रेक लावणे चांगले आहे.
Automatic Cars : ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या कारची क्रेझ वाढत आहे. ऑटोमॅटिक कार चालवताना, लोक सहसा अशा चुका करतात ज्यामुळे गिअरबॉक्सचे प्रचंड नुकसान होते. आज अशाच काही चुका सांगणार आहोत ज्या तुम्ही ऑटोमॅटिक कार चालवताना करू नयेत.
पार्किंग मोड
ऑटोमॅटिक कारमध्ये पार्किंग करताना 'P' मोड वापरला जातो. या मोडमध्ये कार मागे-पुढे जात नाही. जेव्हा कार P मोडमध्ये ठेवली जाते तेव्हा गिअरबॉक्स कॉगला फिरण्यापासून रोखण्यासाठी पार्किंग पॉवरचा वापर होतो. चालत्या कारमध्ये असे केल्याने ट्रान्समिशन खराब होऊ शकते. जेव्हा कार थांबलेली असेल तेव्हाच या मोडचा वापर करा.
उतारावर न्युट्रलमध्ये गाडी चालवणे
उतारावर न्युट्रलमध्ये गाडी चालवणे तुमच्या कारच्या गिअरबॉक्ससाठी धोकादायक आहे. 'N' म्हणजे न्युट्रलमध्ये ऑईल सप्लाय बंद होते. ऑईल सप्लाय बंद झाल्यामुळे ट्रान्समिशन सुरळीत चालण्यासाठी पुरेसे ल्युब्रिकेंट्स मिळत नाहीत. यामुळे कारचा गिअरबॉक्स खराब होतो. या स्थितीत, कारला पेडलने एक्सलरेट केले जात नाही, ज्यामुळे चालकाचे कारवर पूर्ण नियंत्रण नसते. हे खूप धोकादायक ठरु शकते.
चुकीच्या पद्धतीने रिव्हर्स गिअर टाकणे
ऑटोमॅटिक कारमध्ये न थांबता रिव्हर्स गिअर टाकल्याने गिअरबॉक्समध्ये बिघाड होऊ शकतो. जेव्हा ऑटो ट्रांसमिशनमध्ये गिअर टाकला जातो, तेव्हा मॅकेनिजम गिअर्स शिफ्ट करण्यासाठी ट्रान्समिशन बँड आणि क्लच वापरते. त्यामुळे, कार नेहमी थांबल्यानंतर ड्राइव्ह मोडवरून रिव्हर्स मोडवर चालवावी.
लॉन्च कंन्ट्रोल
ऑटोमॅटिक ट्रान्समिशन कारमध्ये 'लॉन्च कंट्रोल' फीचर असते. लॉन्च कंट्रोल वापरताना, बहुतेक लोक रेव्स कार न्यूट्रलमध्ये असतानाच वाढवतात आणि नंतर ड्राइव्ह मोडमध्ये जातात. असे करणे योग्य नाही. यामुळे इंजिन आणि गिअरबॉक्सचे नुकसान होते. यासह, गाडी धक्का देऊन पुढे जाते. ऑटोमॅटिक कार लाँच करण्याचा योग्य मार्ग म्हणजे कारला ड्राइव्ह मोडमध्ये ठेवणे, ब्रेक पेडल दाबणे, रेस वाढवणे आणि लाँच करण्यासाठी तयार झाल्यावर, क्लच सोबत ब्रेक पेडल सोडा.
ट्रॅफिक लाईटमध्ये न्युट्रल
ट्रॅफिक लाईटमध्ये असताना ऑटोमॅटिक कारला न्युट्रल मोड ऐवजी ड्राइव्ह मोडमध्ये ठेवून ब्रेक लावणे चांगले आहे. असं केल्याने तुम्हाला पुन्हा पुन्हा गिअरबॉक्स वापरावा लागणार नाही. जर कारमध्ये स्टॉप-स्टार्ट सिस्टम असेल तर ती वापरा.