(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amazon Great Indian Festival : अमेझॉन ग्रेट इंडियन सेलमध्ये बहुप्रतिक्षित Samsung M52 उपलब्ध होणार
Samsung Galaxy M52 5G Launch : सॅमसंगचा 5जी स्मार्टफोन M52 लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये दमदार स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्सची युजर्सना पर्वणीच आहे.
Samsung Galaxy M52 5G Launch : बहुप्रतिक्षित Samsung Galaxy M52 5G अखेर लॉन्च झाला आहे. भारतापूर्वी कंपनीनं हा स्मार्टफोन पोलंडमध्ये लॉन्च केला होता. भारतीय युजर्ससाठी हा फोन उद्या (28 सप्टेंबर) दुपारी 12 वाजता लॉन्च होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त 120Hz सुपर एमोलेड डिस्प्ले आणि दमदार बॅटरी देण्यात आली आहे. भारतीय युजर्ससाठी हा फोन अमेझॉन ग्रेट इंडियन सेलमध्ये उपलब्ध होणार आहे. अॅमेझॉनच्या अमेझॉन ग्रेट इंडियन या सेल्सची अनेक लोक आतुरतेने वाट पाहत असतात
Samsung Galaxy M52 5G किंमत आणि उपलब्धता
Samsung Galaxy M52 5G ला पोलंडच्या वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला असला तरी याच्या किमतीबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे या स्मार्टफोनच्या किमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
Samsung Galaxy M52 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स
Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सवर नजर टाका. हा स्मार्टफोन अॅन्ड्रॉईड बेस्ट यूआयवर आधारित आहे. यामध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी + सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याचं स्क्रिन रिजोल्यूशन 1,080×2,400 पिक्सल आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसरवर काम करतो आणि यामध्ये पावर बँकअपसाठी 5,000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.
फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy M52 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्रायमरी सेंसर 64MP आहे. तर 12MP चा अल्ट्रा वाइड सेंसर आणि 5MP चा मॅक्रो शूटर अस्तित्वात आहे. तसेच व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फी सुविधेसाठी यामध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पोलंडच्या साईटवर करण्यात आलेल्या लिस्टिंगनुसार, 128GB स्टोरेज देण्यात आलं आहे. ज्यामध्ये मायक्रोएसडी कार्डाच्या मदतीनं हे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवण्यात येऊ शकतं.