Tips : Whatsapp च्या ढिगभर मेसेजमध्ये हवा तो मॅसेज सेव्ह करा एका क्लिक वर!
तुम्ही जर एखाद्या चॅटमधील मेसेज सेव करु इच्छित असाल तर व्हॉट्सअॅपने तशी सुविधा दिलेली आहे
सर्वाधिक लोकप्रिय सोशल मीडिया अॅप व्हॉट्सअॅप आपल्या यूजर्ससाठी नेहमीच नवनवीन फीचर घेऊन येत असतं. तुम्ही जर एखाद्या चॅटमधील मेसेज सेव करु इच्छित असाल तर व्हॉट्सअॅपने तशी सुविधा दिलेली आहे. काही यूजर्सला अजूनही या फीचर बद्दल माहित नाही. या फीचरचे नाव आहे स्टार्ड मेसेज (Starred Messages). या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमचे खास मेसेज स्टार मार्क करुन सेव करुन ठेऊ शकता.
अशा पध्दतीने करा Whatsapp च्या या खास फीचरचा वापर
सगळ्यात आधी तुम्हाला व्हॉट्सअॅप सुरु करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ज्या चॅटमधील मेसेज स्टार मार्क करायचा असेल ते चॅट ओपन करावे लागेल. मग तुम्हाला जो मेसेज स्टार करायचा असेल तो प्रेस करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. त्यातून तुम्ही स्टारपर्यायची निवड करा. तुम्ही स्टार मार्क (Starred Mark) करत तो मेसेज सेव केल्यानंतर तो वेगळ्या पध्दतीने सेव झालेला असेल. त्यानंतर तो मेसेज जर तुम्हाला अनस्टार करायचा असेल तर परत तुम्हाला तो मेसेज प्रेस करावा लागेल. मग पुन्हा तुम्हाला आधीसारखेच पर्याय दिसतील. त्यातून स्टार ऐवजी अनस्टारच्या पर्यायाची निवड करा.
येथे बघता येतील स्टार्ड मेसेज (Starred Messages)
स्टार मार्क केलेला मेसेज जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही ज्या चॅटमधील मेसेज निवडला आहे त्या प्रोफाइलमध्ये जाऊन स्टार मेसेजवर सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्ही जे मेसेज स्टार केले आहेत ते तुमच्यासमोर उपलब्घ होतील.