(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Realme 9 pro Series : Realme यूजर्ससाठी खुशखबर! कंपनीने लॉंच केले दोन नवीन स्मार्टफोन, 'हे'आहेत जबरदस्त फीचर्स
Realme Smartphone : Realme यूजर्ससाठी खुशखबर! Realme 9 Pro Plus 21 फेब्रुवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
Realme 9 Pro series launch : Realme ने आपले दोन नवीन स्मार्टफोन Realme 9 pro आणि Realme 9 pro Plus भारतात लॉंच केले आहेत. या स्मार्टफोन्सच्या किंमती आणि फीचर्स जाणून घ्या.
Realme 9 Pro Plus चे फीचर्स :
Realme 9 Pro मध्ये MediaTek Dimensity 920 5G प्रोसेसर आहे. हा मोबाईल दोन प्रकारात लॉंच करण्यात आला आहे. 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटर्नल मेमरी आणि दुसरी 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटर्नल मेमरी दिली आहे. या मोबाईलला पॉवर देण्यासाठी यामध्ये 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. हे 60 वॅट फास्ट चार्जरला सपोर्ट करते. फोनमध्ये चार्जिंगसाठी टाईप सी पोर्ट देण्यात आला आहे. हा मोबाईल ड्युअल सिम असून दोन्ही सिम 5G ला सपोर्ट करतात. हे Google च्या Android 12 वर कार्य करेल.
Realme 9 Pro Plus डिस्प्ले आणि कॅमेरा :
या मोबाईलमध्ये 6.4-इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे रिझोल्यूशन 2400X1080 पिक्सेल आहे. तसेच कॅमेऱ्यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा, दुसरा कॅमेरा 8 मेगापिक्सल आणि तिसरा कॅमेरा 2 मेगापिक्सल्सचा आहे. यामध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.
Realme 9 Pro चे फीचर्स :
या मोबाईलमध्ये Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसर देण्यात आला आहे . हा मोबाईल दोन प्रकारात लॉंच करण्यात आला आहे. 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटर्नल मेमरी आणि दुसरी 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल मेमरी आहे. मोबाईलमध्ये व्हर्चुअल रॅम देण्यात आली आहे. म्हणजे त्याच्या 8 GB RAM व्हेरियंटची RAM 5 GB ने वाढवता येते. अशा प्रकारे या व्हेरियंटची रॅम 13 GB पर्यंत असेल. मोबाईलला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. हे 33W फास्ट चार्जरला सपोर्ट करते. मोबाईलला चार्जिंगसाठी टाईप सी पोर्ट देण्यात आला आहे. हा मोबाईल ड्युअल सिम असून दोन्ही सिम 5G ला सपोर्ट करतात. हे Google च्या Android 12 वर कार्य करेल.
Realme 9 Pro डिस्प्ले आणि कॅमेरा :
डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 6.6-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे रिझोल्यूशन 2412X1080 पिक्सेल आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये प्राथमिक कॅमेरा 64 मेगापिक्सेल, दुसरा कॅमेरा 8 मेगापिक्सल आणि तिसरा कॅमेरा 2 मेगापिक्सलचा आहे. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.
या स्मार्टफोनची किंमत नेमकी काय?
Realme 9 pro Plus ची सुरुवातीची किंमत 24,999 रुपये आहे. तर, Realme 9 pro ची सुरुवातीची किंमत रुपये 17,999 आहे. Realme 9 pro Plus 21 फेब्रुवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. तर, Realme 9 pro 23 फेब्रुवारीपासून बाजारात उपलब्ध असणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Gadget Price : 1 एप्रिल पासून 'या' गॅजेट्सच्या किंमतीत होणार बदल, जाणून घ्या काय स्वस्त, काय महाग
- Amazon Sale : iPhone घ्यायचाय.. मग 'या' ऑफरचा नक्की करा विचार
- Jio चा मोठा निर्णय; आता ब्रॉडब्रँडला 100 Gbps इंटरनेट स्पीड मिळणं शक्य
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha