Gadget Price : 1 एप्रिल पासून 'या' गॅजेट्सच्या किंमतीत होणार बदल, जाणून घ्या काय स्वस्त, काय महाग
Gadgets Price changes from 1st April : एक एप्रिल पासून काही गॅजेट्सच्या किंमतीत बदल होणार आहेत. जाणून घ्या कोणत्या गॅजेट्सच्या किंमतीवर होणार परिणाम
Gadgets Price changes from 1st April : केंद्रीय अर्थसंकल्प सादर होऊन जवळपास दोन आठवडे झाले आहेत. अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी विविध घोषणा केल्या आहेत. देशातंर्गत उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. यामध्ये विशेषत: इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्सवर अधिक भर देण्याचा प्रयत्न करण्यात आला. एक एप्रिलपासून या वस्तूंच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे.
स्मार्टफोन स्वस्त होणार?
मोबाइल फोन चार्जर ट्रान्सफॉर्मरचे भाग, मोबाइल कॅमेरा मॉड्युलचे कॅमेरा लेन्स आणि इतर भागांवर 5 ते 12.5 टक्क्यांपर्यंत सीमा शुल्कात सवलत देण्यात आली आहे. यामुळे स्मार्टफोन उत्पादनाच्या खर्चात कपात होणार आहे. त्याचा फायदा युजर्सना होऊ शकतो.
स्मार्टवॉट, फिटनेस बॅण्ड स्वस्त होण्याची शक्यता
स्मार्टवॉचसाठी वापरण्यात येणाऱ्या काही भागांसाठी सीमा शुल्कात मिळणारी सवलत 31 मार्च 2023 पर्यंत असणार आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात फारसी वाढ होणार नाही. त्यामुळे स्मार्टवॉचदेखील स्वस्त होतील.
वायरलेस इअरबड महाग होण्याची शक्यता
वायरलेस इअरबड निर्मितीसाठी लागणाऱ्या सुट्ट्या भागांवर आयात कर वाढवण्यात आला आहे. युजर्सला वायरलेस ईअरबड्स, नेकबॅण्ड हेडफोन आणि अशाप्रकारच्या गॅजेट्स महाग होऊ शकतात.
प्रीमियम हेडफोन ; महाग होण्याची शक्यता
हेडफोन्सच्या थेट आयातीवर आता 20% जास्त शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे याची किंमत अधिक वाढणार आहे.
रेफ्रिजरेटर महागणार?
कॉम्प्रेसरमध्ये वापरण्यात येणाऱ्या काही भागांवरील आयात कर वाढवण्यात आला आहे. त्यामुळे रेफ्रिजरेटर महागण्याची शक्यता आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Amazon Sale : iPhone घ्यायचाय.. मग 'या' ऑफरचा नक्की करा विचार
- Jio चा मोठा निर्णय; आता ब्रॉडब्रँडला 100 Gbps इंटरनेट स्पीड मिळणं शक्य
- EV : जबरदस्त! अमेरिकेत होणार 'इलेक्ट्रिक रोड'! ज्यावर चालत्या इलेक्ट्रिक व्हेईकल्स चार्ज होणार, भारतातही शक्य होणार?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha