एक्स्प्लोर
अखेर 'पोकेमॉन गो'ला भारतात लाँचिंगचा मुहूर्त मिळाला

नवी दिल्ली : मच अवेटेड गेम पोकेमॉन गोचा भारतात लाँचिंगचा मुहूर्त अखेर ठरला आहे. या गेमने जगभरातील तरुणाईला अक्षरशः वेड लावलं आहे. भारतात येण्यासाठी पोकेमॉन गेमने रिलायन्स जिसोबत करार केला आहे. रिलायन्स जिओकडून या गेमचा आपल्या प्ले स्टोअरमध्ये समावेश करण्यात येणार आहे. बुधवार म्हणजेच उद्यापासून या गेमचं ऑफिशिअल व्हर्जन युझर्सना डाऊनलोड करता येणार आहे. रिलायन्स डिजिटलच्या काही स्टोअर्समध्ये पोकेशॉप आणि जिम उपलब्ध करुण देण्यात येणार आहे. पोकेशॉप हे एक व्हर्च्युअल दुकान असून यामध्ये पोकेमॉन पकडण्यासाठी आवश्यक वस्तू मिळतात. तर जिम देखील व्हर्च्युअल असून यामध्ये पोकेवॉरसाठी तुमच्या पोकेमॉनला ट्रेनिंग देता येईल. पोकेमॉन गो गेम यावर्षी जुलैमध्ये लाँच करण्यात आली. भारतासह जगभरातील स्मार्टफोन युझर्सना या गेमने वेड लावलं आहे. ही गेम खेळताना अनेकांनी आपला प्राण गमावला असल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. संबंधित बातम्या :
पोकीमॉन गो गेमने जगभरातील तरुणाई ‘सैराट’
पोकेमॉन गो गेम विषयीच्या रंजक गोष्टी
'पोकेमॉन गो'मधील अंड्यांना आक्षेप, हायकोर्टाची सरकारला नोटीस
पोकेमॉन गो खेळणाऱ्यांचे मोबाईल हिसकावणारी टोळी जेरबंद
जेव्हा अनुष्काही पोकेमॉन शोधत घराबाहेर जाते..
पोकेमॉन गो रस्त्यांवर खेळण्यास पोलिसांकडून बंदीची शक्यता
Pokemon Go खेळताना 18 वर्षीय मुलाचा मृत्यू
Pokémon GO खेळताना महिलेसोबत घडली विचित्र घटना
153 किमी प्रवास, दोन आठवड्यात सर्व पॉकिमॉन खिशात
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
व्यापार-उद्योग
राजकारण
क्राईम























