एक्स्प्लोर
Advertisement
ब्लू व्हेल गेमविरोधात हायकोर्टात याचिका, आज तातडीने सुनावणी
जीवघेणा ऑनलाईन गेम 'द ब्लू व्हेल' विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
मुंबई: जीवघेणा ऑनलाईन गेम 'द ब्लू व्हेल' विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सिटीझन सर्कल फॉर सोशल वेलफेअर अँड एज्युकेशन या सेवाभावी संस्थेच्यावतीनं ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
या याचिकेत गुगल, फेसबुक, याहू यांच्यासह मुंबई पोलिसांच्या सायबर सेललाही प्रतिवादी बनवलं आहे. याचिकाकर्त्यांची मागणी आहे की, प्रशासनानं द ब्लू व्हेल गेमशी संबंधित तक्रारी आणि समस्यांसाठी एक हेल्पलाईन सुरु करावी. जेणेकरून या गेमच्या आहारी जाणारी लहान मुलं तसेच त्यांच्या पालकांना यासंदर्भात तातडीनं मदत करता येईल.
ब्लू व्हेल गेमची मास्टर माईंड सापडली, 17 वर्षीय मुलीला बेड्या
रशियातून उदयास आलेल्या या गेममध्ये खेळणारा आणि त्याचा अदृश्य मार्गदर्शक यांच्यात अजाणतेपणी एक दृढ नातं निर्माण होतं. ठराविक टप्यानंतर खेळणाऱ्याला त्याचा मार्गदर्शक एक-एक काम सांगत जातो. पुढच्या टप्यावर पोहचण्यासाठी ते काम पूर्ण करून त्याचा पुरावा देणं खेळणा-याला बंधनकारक असतं. आणि या खेळात शेवटच्या टप्यावर खेळणा-याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं जातं.
या खेळाच्या काही घटना मुंबईसह देशभरात घडल्याच्या बातम्या माध्यमांत प्रसिद्ध झाल्या आहेत. केंद्र सरकारनंही नुकतेच हा संपूर्ण ऑनलाईन गेम देशभरात ब्लॉक करण्याचे निर्देश दिलेत. मात्र इंटरनेटवर एखाद्या गोष्टीला संपूर्णपणे तात्काळ बंद करणं हे तितकसं सोपं राहिलेलं नाही. गुरुवारी या याचिकेवर हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींपुढे तातडीनं सुनावणी होणार आहे.
काय आहे ‘ब्ल्यू व्हेल’ गेम?
ऑनलाईन खेळल्या जाणाऱ्या या गेममध्ये एक ‘मास्टर’ मिळतो मास्टर प्लेअरला कठीण टास्क देतो. स्वत:च्या रक्ताने ब्ल्यू व्हेल तयार करणं, शरीरावर जखमा करणे, दिवसभर हॉरर फिल्म पाहणे, रात्रभर जागणे अशा प्रकारचे टास्क मिळाल्यामुळं खेळणारे नैराश्याच्या गर्तेत जातात अशा प्रकारे मास्टर प्लेअरवर 50 दिवस कंट्रोल ठेवतो. खेळाचा शेवटचा टप्पा म्हणजे प्लेअरला आत्महत्या करण्याचं आव्हान दिलं जातं आणि स्वतःची हिंमत सिद्ध करण्यासाठी अनेक प्लेअर आत्महत्या करतात.
हातावर F57 लिहावं लागतं
गेम खेळणाऱ्याला दररोज एक कोड नंबर दिला जातो. यामध्ये हातावर ब्लेडने F57 लिहावं लागतं. ते लिहून फोटो अपलोड करावा लागतो. या गेमचा अॅडमिन स्काईपवरुन गेम खेळणाऱ्याशी संपर्कात असतो. जो शेवटच्या दिवशी आत्महत्या करतो, त्यालाच विजेता घोषित केलं जातं.
22 वर्षीय मास्टरमाईंडची धक्कादायक माहिती
फिलीप बुडेकिन उर्फ फिलीप लिस (फॉक्स) या 22 वर्षांच्या रशियन तरुणाने हा गेम तयार केला आहे. सोशल मीडियावर तरुणांशी मैत्री केल्यानंतर तो त्यांचा ब्रेनवॉश करतो. या गेमच्या निर्मितीमागील त्याने सांगितलेलं कारण अत्यंत धक्कादायक आहे. पृथ्वीवरील जैविक कचरा (biological waste) स्वच्छ करण्यासाठी हा घाट घातल्याचं तो सांगतो.
मुंबईत 14 वर्षीय तरुणाची आत्महत्या
रशियात शेकडो मुलांच्या आत्महत्येसाठी कारणीभूत ठरलेल्या ब्ल्यू व्हेल गेमने भारतातही शिरकाव केल्याचं पाहायला मिळालं. कारण याच ब्ल्यू व्हेल गेमच्या नादापायी अंधेरीतल्या 14 वर्षाच्या मुलाने आपला जीव गमावला. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातील ही घटना घडली.
मुंबईच्या अंधेरी परिसरातल्या शेर ए पंजाब कॉलनीमध्ये राहणाऱ्या 14 वर्षाच्या मनप्रीत सहानने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली.
मात्र, मनप्रीतच्या कृत्याला आत्महत्या म्हणायचं की हत्या, असा प्रश्न त्याच्या कुटुंबीयांपासून पोलिसांनाही पडला आहे. कारण ब्ल्यू व्हेल या जीवघेण्या खेळाच्या नावाखाली मनप्रीतला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आल्याचं समोर आलं होतं.
संबंधित बातम्या
ब्लू व्हेल गेमची मास्टर माईंड सापडली, 17 वर्षीय मुलीला बेड्या
ब्ल्यू व्हेल गेमच्या 22 वर्षीय मास्टरमाईंडची धक्कादायक माहिती
‘ब्लू व्हेल’ गेमच्या नादापायी मुंबईतील 14 वर्षीय मुलाची आत्महत्या
जीवघेण्या ‘ब्लू व्हेल’ गेममुळे 130 मुलांची आत्महत्या?
ब्लू व्हेल गेम विधानसभेत, अजित पवारांच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचं उत्तर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
क्रिकेट
Advertisement