Paytm कडून किफायतीशीर मोबाइल रिचार्जेसची सुविधा, ऑनलाईन रिचार्ज केल्यास मिळणार ऑफर
Paytm Online Recharge : अलीकडे मोबाईल रिचार्ज अत्यंत महागला आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.
Paytm Online Recharge : भारताच्या आघाडीच्या ग्राहक आणि व्यापाऱ्यांसाठीची डिजिटल परिसंस्था असणाऱ्या पेटीएमने (Paytm) प्रीपेड रिचार्जच्या दरात वाढ झाल्यानंतर प्रीपेड मोबाइल रिचार्जसाठी कॅशबॅक आणि इतर रिवॉर्डसची घोषणा केली आहे. त्यामुळे पेटीएमद्वारे रिचार्जेसवर युजर्सना आता सूट मिळणार आहे. यामध्ये प्रोमो कोड 'FLAT15'चा वापर केल्यास थेट 15 रूपयांची सूट ग्राहकांना मिळेल. याशिवाय इतरही अनेक ऑफर्स ग्राहकांना मिळणार असून त्यामध्ये प्रोमो कोड 'WIN1000' वापरावर 1 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक जिंकण्याची संधीही युजर्सना आहे.
या ऑफर्स जिओ, व्हीआय, एअरटेल, बीएसएनएल आणि एमटीएनएल अशा सर्व प्रीपेड कनेक्शन्सवर लागू आहे. ज्यामुळे युजर्सना रिचार्ज रक्कमेव्यतिरिक्त कोणतीही रक्कम भरावी लागणार नाही. याशिवाय मोबाइल रिचार्जसाठी पेटीएमचा वापर करताना इतर युजर्सना याबाबत माहिती देऊन रेफर केल्यास अर्थात पेटीएमवर आणल्यास 100 रूपयांची कॅशबॅकही जिंकण्याची संधी युजर्सना आहे. पेटीएम युजर्सना पेटीएम यूपीआय, पेटीएम वॉलेट, डेबिट आणि क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग यापैकी कोणत्याही पेमेण्ट मोडमधून निवड करण्याची मुभा देते. युजर्स कंपनीचे 'बाय नाऊ पे लेटर' या पेटीएम पोस्टपेड वैशिष्ट्याचा उपयोग करून देखील पेमेण्ट करू शकतात.
पेटीएम ही कंपनी मोबाइल रिचार्ज आणि बिल पेमेण्ट्सची सुविधा देते. यामुळे लाखो युजर्सना दररोज अनेक महत्त्वाची कामे घरबसल्या करता येत आहेत. पेटीएम युजर्स घरांमधून आरामात त्यांच्या विजेची बिले, क्रेडिट कार्ड बिले, सिलिंडर बुकिंग्ज आणि अनेक दैनंदिन गरजांसाठी पेमेण्ट्स करू शकतात.
संबंधित बातम्या:
- PayTM listing : शेअर बाजारात पेटीएमच्या 'Listing Loss'नंतर पुढे काय?
- PayTM पेटीएमच्या शेअर दरात घसरण का? 'ही' आहेत कारणे
- PayTM IPO पेटीएमच नव्हे तर या 10 कंपन्यांच्या IPO चा फुटला होता फुगा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha