PayTM IPO पेटीएमच नव्हे तर या 10 कंपन्यांच्या IPO चा फुटला होता फुगा
IPO share market : पेटीएम शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर त्याच्या शेअर दरात 27 टक्के घसरण दिसून आली. पेटीएमच्या आधीदेखील काही शेअरमध्ये 10 टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली होती.
PayTM IPO : पेटीएमचा IPO शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला. पहिल्याच दिवशी पेटीएमच्या शेअर भावात 27 टक्क्यांची घसरण दिसून आली. पेटीएमचा आयपीओ हा भारतातील सर्वात मोठा आयपीओ होता. मात्र, या आयपीओला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. शेअर बाजारात सूचीबद्ध होताना फुगा फुटणारा पेटीएम ही पहिलीच कंपनी नाही. या आधीदेखील असाच फुगा काही कंपन्यांचा फुटला होता.
या आधी सन 2008 मध्ये रिलायन्स पॉवरच्या 10 हजार 123 कोटीच्या आयपीओ वेळीदेखील शेअर बाजारात मोठी चर्चा सुरू होती. हा शेअर आयपीओतील प्रतिशेअर किंमतीपेक्षा दुप्पट किंमतीने सूचीबद्ध होईल असा अनेकांचा होरा होता. रिलायन्स पॉवरचा आयपीओ 72 पटीने अधिक सब्सक्राइब करण्यात आला होता. मात्र, रिलायन्स पॉवरचा शेअर हा किरकोळ प्रीमियमसह शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. त्यानंतर काही वेळेतच हा शेअर 17 टक्क्यांनी घसरला. हा स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर पहिल्या दिवशी 372 रुपयांच्या दरावर हा शेअर बंद झाला. यानंतर रिलायन्स पॉवरचा शेअर कघीही आपल्या या किंमतीपर्यंत पोहचला नाही.
त्याचप्रमाणे, नोव्हेंबर 2015 मध्ये, कॉफी डे एंटरप्रायझेसचा 1,150 कोटी रुपयांचा IPO 1.81 पट ओव्हरसबस्क्राइब झाला होता, परंतु सूचीबद्धतेच्या दिवशी त्याचे मूल्य 17% कमी झाले.
एप्रिल 2018 मध्ये ICICI सिक्युरिटीजच्या IPO ला देखील गुंतवणूकदारांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. शेवटच्या दिवसापर्यंत फक्त 78% सदस्य झाले. कमकुवत सबस्क्रिप्शनमुळे, कंपनीने तिचा IPO आकार कमी करून 3,500 कोटी रुपये केला आणि त्याची किंमत प्रति शेअर 520 रुपये केली.
अशाच काहीसा प्रकार, केयर्न इंडिया लिमिटेड, UTI एसेट मैनेजमेंट, कल्याण ज्वैलर्स इंडिया लिमिटेड, भारती इंफ्राटेल लिमिटेड, इंडिया बुल्स पॉवर लिमिटेड, ICICI प्रुडेंशियल लाइफ इन्शुरन्स, JAYPEE इन्फ्राटेक लिमिटेड या कंपन्याच्या शेअरमध्येही सूचीबद्ध झालेल्या दिवशी 10 टक्के ते 17.64 टक्के घसरण झाली होती.
संबंधित बातम्या:
PayTM listing : शेअर बाजारात पेटीएमच्या 'Listing Loss'नंतर पुढे काय?
PayTM पेटीएमच्या शेअर दरात घसरण का? 'ही' आहेत कारणे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha