एक्स्प्लोर
ओप्पोचा पहिला टॅबलेट उद्या होणार लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Oppo Pad Air Launch Date: सॅमसंगचे भारतातील अँड्रॉइड टॅबलेट मार्केटवर वर्चस्व आहे. यानंतर Xiaomi आणि Realme सारख्या ब्रँडचे टॅब्लेटची सर्वाधिक देशात विक्री होते.
Oppo Pad Air Launch Date: सॅमसंगचे भारतातील अँड्रॉइड टॅबलेट मार्केटवर वर्चस्व आहे. यानंतर Xiaomi आणि Realme सारख्या ब्रँडचे टॅब्लेटची सर्वाधिक देशात विक्री होते. अशातच आता Samsung, Xiaomi आणि Realme यांना जोरदार स्पर्धा मिळणार आहे, कारण Oppo ब्रँड देखील भारताच्या टॅबलेट मार्केटमध्ये प्रवेश करणार आहे. Oppo चा पहिला टॅबलेट Oppo Pad Air उद्या (18 जुलै 2022) लाँच होणार आहे. चला तर या टॅब्लेटबद्दल सविस्तर जाणून घेऊया...
Oppo Pad Air चे स्पेसिफिकेशन्स
- Oppo Pad Air टॅबलेट 10.36 इंच डिस्प्ले आकारात लॉन्च केला जाऊ शकतो.
- Oppo Pad Air चा स्क्रीन रिफ्रेश रेट 60Hz असू शकतो.
- ओप्पो पॅड एअर टॅब 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज पर्यायामध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. याशिवाय यामध्ये 3 जीबी व्हर्च्युअल रॅम सपोर्ट मिळू शकतो.
- Oppo Pad Air Tab LPDDR4x रॅम सपोर्टसह लॉन्च केला जाऊ शकतो.
- ओप्पो पॅड एअर टॅबमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट सपोर्ट प्रोसेसर सपोर्ट म्हणून मिळू शकतो. तसेच हा टॅब Adreno 610 GPU सपोर्टसह येईल.
- Oppo Pad Air च्या मागील पॅनलवर 8-मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल. याशिवाय सेल्फीसाठी 5 मेगापिक्सेल कॅमेरा सपोर्ट दिला जाऊ शकतो.
- Oppo Pad Air टॅबलेट Android 12 आधारित कलर OS सपोर्टसह लॉन्च केला जाईल, असं बोलले जात आहे.
- पॉवर बॅकअप म्हणून टॅब्लेटमध्ये 7,100mAh बॅटरी सपोर्ट मिळू शकतो. ज्याला 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो.
- कनेक्टिव्हिटी फीचर्ससाठी टॅबमध्ये Wi-Fi 5, Bluetooth v5.1 आणि USB Type-C पोर्ट दिले जाऊ शकतात.
- Oppo Pad Air क्वाड स्पीकर्स आणि डॉल्बी अॅटमॉस सपोर्टसह येईल.
- Oppo Pad Air सह Oppo पेन्सिल आणि स्मार्ट मॅग्नेटिक सपोर्ट मिळू शकतो.
Oppo Pad Air ची किंमत
Oppo Pad Air भारतात 15,000 रुपयांच्या प्रारंभिक किमतीत लॉन्च केला जाऊ शकतो. हा बजेट फ्रेंडली टॅब असेल. कंपनी सध्या टॅब एकाच स्टोरेज प्रकारात लॉन्च करू शकते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement