(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ola CEO Bhavish Aggarwal : ओला कंपनीचे सीईओ थिरकले 'बिजली बिजली' गाण्यावर; नव्या फिचरचं केलं टेस्टिंग
ओला कंपनीचे को- फाऊंडर भाविश अग्रवाल( Bhavish Aggarwal) यांनी नुकतेच या नव्या फिचरचे टेस्टिंग एका खास पद्धतीनं केलं.
Ola CEO Bhavish Aggarwal : ओला कंपनीनं त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये moveOS 2.0 हे नवे ऑपरेटिंग सिस्टिम दिले आहे. या ऑपरेटिंग सिस्टिंमुळे आता ग्राहकांनी स्कूटरमध्ये म्युझिक फिचर मिळेल. म्हणजेच या स्कूटरवर प्रवास करतान आता ग्राहकांचे मनोरंजन देखील होणार आहे. ओला कंपनीचे को- फाऊंडर भाविश अग्रवाल( Bhavish Aggarwal) यांनी नुकतेच या नव्या फिचरचे टेस्टिंग एका खास पद्धतीनं केलं.
ओला कंपनीच्या स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग विभागाचे प्रमुख स्लोकार्थ डॅश यांच्यासोबत हार्डी संधूच्या बिजली बिजली या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ नुकताच भाविश अग्रवाल यांनी शेअर केला. या व्हिडीओमध्ये ओला इलेक्ट्रिक स्कूटर देखील दिसत आहे. भाविश अग्रवाल यांनी हा डान्स व्हिडीओ शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'MoveOS 2 या म्युझिक फिचरचं फाईनल टेस्टिंग करत आहे.'
Doing some final “expert testing” for the MoveOS 2 music feature 😄🕺🏼@slokarth pic.twitter.com/ogxrfS4F7e
— Bhavish Aggarwal (@bhash) April 19, 2022
अनेक नेटकऱ्यांनी भाविश यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ' MoveOS 2.0 सारखे अमेझिंग म्ह्यूव्ज'
Amazing moves just like move os2 🙌
— Koushal Seth (@koushalseth) April 19, 2022
तर दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट करून या लाँच डेटबाबत विचारलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- येत आहेत Yamaha चे 'हे' दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, जबरदस्त लूकसह फीचर्सही आहेत दमदार
- Maruti Suzuki Car: आजपासून कार घेणं महाग; मारुतीच्या सर्व कार मॉडेल्सच्या किमतीत वाढ
- Top Safest Car: लहान-मोठ्यांसाठी असलेली 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेल्या कार; पाहा यादी
- 'या' दिवशी लॉन्च होणार Mercedes-Benz ची नवीन सी-क्लास लक्झरी कार, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत