'या' दिवशी लॉन्च होणार Mercedes-Benz ची नवीन सी-क्लास लक्झरी कार, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
Mercedes C Class: लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेन्झ भारतात आपली नवीन कार लॉन्च करण्यास सज्ज झाली आहे.
Mercedes C Class: लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेन्झ भारतात आपली नवीन कार लॉन्च करण्यास सज्ज झाली आहे. मर्सिडीज-बेंझ 10 मे रोजी आपली नवीन 2022 सी-क्लास रेंज लॉन्च करणार आहे. कंपनीने आपल्या या नवीन कारची बुकिंग देखील सुरू केली आहे. ग्राहक 50 हजारच्या टोकन रक्कमसह ही कार बुक करू शकतात. मात्र ही कार फक्त ज्यांच्याकडे सध्या मर्सिडीज-बेन्झ आहे त्यांनाच बुक करता येणार आहे. मर्सिडीज-बेन्झ कार मालक 30 एप्रिलपर्यंत ही नवीन कार बुक करू शकतात. 1 मे नंतर सर्वाना ही कार बुक करता येणार आहे.
मर्सिडीज-बेंझ सी-क्लास C200, C220d आणि टॉप-एंड C300d या तीन प्रकारांमध्ये लॉन्च होणार आहे. 5व्या पिढीच्या सी-क्लासमध्ये अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. कारची रोड प्रेझेन्स वाढवण्यासाठी याच्या आकारमानात बरेच बदल केले आहेत. मात्र कंपनीने अद्याप याबाबत अधिक माहिती शेअर केलेली नाही. कंपनीने या कारमध्ये एक मोठा ओरिएंटेड मेन डिस्प्ले स्क्रीन आणि पूर्णपणे सुधारित डॅशबोर्ड लेआउट दिला आहे. यासोबतच यात नव्याने तयार करण्यात आलेल्या व्हेंटिलेशन सीट्सही उपलब्ध उपलब्ध आहे.
नवीन Mercedes-Benz C-Class च्या C200 प्रकारात 2.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. जे 197 hp पॉवर निर्माण करण्यास सक्षम असेल. तसेच C300d प्रकारात 2.0-लिटर डिझेल इंजिन मिळू शकते, जे 245 hp पॉवर जनरेट करू शकते. या व्यतिरिक्त C220d प्रकारात 2.0-लिटर इंजिन दिले जाऊ शकते.
महत्वाच्या बातम्या :
- Yamaha ची ही स्वस्त स्पोर्ट्स बाईक झाली लाँच, कमी किंमतसह मिळणार 'हे' जबरदस्त फीचर्स
- नव्या फिचरसह ह्युंदाईची स्वस्तातील क्रेटा कार लॉन्च, जाणून घ्या किंमत
- Next-Gen Ertiga Booking Starts: मारुतीची नवीन Next-Gen Ertiga येतेय, आजपासून बुकिंग सुरू
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha