एक्स्प्लोर

Moto G60 Launched : 108MP कॅमेरा अन् 6000mAh ची बॅटरी; दमदार फिचर्ससह Moto G60 लॉन्च, किंमत काय?

Moto G60 मधील सर्वात खास गोष्ट म्हणजे, या फोनचा कॅमेरा. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे. ज्यामध्ये 108MP चा प्रायमरी सेंसर, 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2MP चा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे.

मुंबई : जर तुम्हाला एक उत्तम फिचर्स असणारा कॅमेरा फोन खरेदी करायचा असेल तर Motorola ने भारतात आपला Moto G60 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Motorolaच्या G-सीरीज मधील या फोनची अनेक युजर्स गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. महत्त्वाचं म्हणजे, मोटोच्या या स्मार्टफोनचा लूक आकर्षक आहे. तसेच यामध्ये युजर्सना 2 कलर ऑप्शन्स मिळणार आहे. मोटो जी60 स्मार्टफोनबाबत खास गोष्ट म्हणजे, या फोनचा 108MP चा प्रायमरी कॅमेरा. या कॅमेऱ्याच्या मदतीने तुम्ही क्लासी फोटो क्लिक करु शकता. त्याचसोबत याची किंमतही युजर्सचं लक्ष आपल्याकडे खेचून घेत आहे. 

Moto G60 चे स्पेसिफिकेशन्स

Moto G60 च्या स्पेसिफिकेशन्सबाबत बोलायचं झालं तर Moto G60 मध्ये अॅन्ड्रॉईड 11 देण्यात आलं आहे. या फोनमध्ये 6.8 इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आलेला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 732G प्रोसेसर देण्यात आलेला आहे. तसेच स्टोरेज आणि रॅमबाबत बोलायचं झालं तर या फोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आलेलं आहे. तुम्ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवू शकता. 

Moto G60 चा कॅमेरा

Moto G60 मधील सर्वात खास गोष्ट म्हणजे, या फोनचा कॅमेरा. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे. ज्यामध्ये 108MP चा प्रायमरी सेंसर, 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2MP चा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच याचा कॅमेरा HDR, टायमर आणि प्रो मोड यांसारख्या फिचर्सनी परिपूर्ण आहे. 

Moto G60 मधील इतर फिचर्स 

मोटो जी60 मध्ये दमदार बॅटरी देण्यात आलेली आहे. यामध्ये  6,000mAh ची बॅटरी, 20W फास्ट चार्जिंग आणि  क्वालकॉम क्विक चार्ज 4.0 सपोर्ट देण्यात आलं आहे. या फोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर आणि वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ 5.0 यांसारखे फिचर्स देण्यात आलेले आहेत. 

स्मार्टफोनच्या किमतीबाबत बोलायचं तर Moto G60 स्मार्टफोन तुम्ही केवळ 17,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. तुम्हाला Dynamic Gray आणि Frosted Champagne या क्लासी कलर्समध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध होणार आहे. 

या फोनसोबत स्पर्धा

गेल्या काही दिवसांत अनेक दमदार स्मार्टफोन्स बाजारात दाखल झाले आहेत. त्यातील बरेच स्मार्टफोन 108MP कॅमेऱ्यासह लॉन्च करण्यात आले आहेत. अशातच Moto G60 फोनची स्पर्धा Realme 8 Pro सोबत होऊ शकते. रियलमी 8 प्रोमध्ये 108 मेगापिक्सलचा क्लासी कॅमेरा देण्यात आला आहे. हा 108MP कॅमेरा असणाऱ्या स्मार्टफोनच्या रेंजमधील सर्वात स्वस्त फोन आहे. आता या फोनला मोटो जी60 टक्कर देणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget