Tech News | लॅपटॉप खरेदी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा
प्रोसेसर हा लॅपटॉपचा सर्वात महत्वाचा भाग आहे. आपण लॅपटॉप खरेदी करत असल्यास, लेटेस्ट प्रोसेसर असलेला लॅपटॉप निवडा. कोणत्याही लॅपटॉपचा स्पीड आणि परफॉर्मन्स त्याच्या प्रोसेसरवर अवलंबून असतो.
Tech News | देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे बहुतेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय देत आहेत. देशातील कोट्यवधी लोक सध्या घरून काम करत आहेत. अशा परिस्थितीत देशात लॅपटॉपची मागणी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे लॅपटॉप खरेदी वाढली आहे. मात्र लॅपटॉप खरेदी करताना बजेटनुसार सर्वोत्कृष्ट लॅपटॉप तुम्ही निवडू शकता.
बजेट सेट करा
जर लॅपटॉप खरेदी करणार असाल तर प्रथम तुमचे बजेट ठरवा. मार्केटमध्ये 20 ते 25 हजारच्या रेंजमध्ये चांगल्या फीचर्ससह लॅपटॉप उपलब्ध आहेत. इंटरनेटवर बजेट लॅपटॉपची लिस्ट पाहू शकता, जेणेकरून चांगला लॅपटॉप निवडणे शक्य होईल. वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या किंमतीचे लॅपटॉप देत आहेत.
स्क्रीन साईज
आपण व्यावसायिक कामासाठी लॅपटॉप वापरत असल्यास, मध्यम आकाराचे लॅपटॉप खरेदी करण्यास प्राधान्य देणार. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, 14 इंच स्क्रीन लॅपटॉप आजकाल बराच वापरला जातोय. आपल्या गरजेनुसार आपण लॅपटॉपची साईज निवडू शकता.
प्रोसेसर आणि रॅम
प्रोसेसर हा लॅपटॉपचा सर्वात महत्वाचा भाग आहे. आपण लॅपटॉप खरेदी करत असल्यास, लेटेस्ट प्रोसेसर असलेला लॅपटॉप निवडा. कोणत्याही लॅपटॉपचा स्पीड आणि परफॉर्मन्स त्याच्या प्रोसेसरवर अवलंबून असतो. जर आपल्या लॅपटॉपमध्ये अधिक रॅम असेल तर त्याचा परफॉर्मन्स अधिक चांगला होईल. अशा परिस्थितीत, लॅपटॉप खरेदी करण्यापूर्वी त्याचा प्रोसेसर आणि किती जीबी रॅम आहे ते पाहा. बाजारात तुम्हाला कमी बजेटमध्ये 4 जीबी रॅमसह लॅपटॉप मिळेल.
स्टोरेज आणि बॅटरी
लॅपटॉपमध्ये जितका जास्त स्टोरेज आहे तितका डेटा त्यात स्टोअर करता येतो. आपण आपल्या व्यावसायिक वापरासाठी लॅपटॉप विकत घेत असल्यास, अधिक स्टोरेज असलेला लॅपटॉप खरेदीस प्राधान्य द्या. लॅपटॉपसाठी चांगली बॅटरी देखील आवश्यक आहे. आजचे लॅपटॉप 3-4 तासांचा बॅटरी बॅकअप देत आहेत. लॅपटॉपची बॅटरी जितकी चांगली असेल तितकी जास्त वेळ आपण त्याचा वापर करू शकता.