एक्स्प्लोर
LG चे दोन नवे स्मार्टफोन लॉन्च, 4G कनेक्टिव्हिटीसह जबरदस्त फीचर्स

मुंबई : कमी बजेटचे स्मार्टफोन बनवणारी कंपनी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या एलजी कंपनीने दोन नवे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. X5 आणि X Skin असे दोन स्मार्टफोन एलजीने बाजारात आणले आहेत. सध्या दक्षिण कोरियात हे स्मार्टफोन लॉन्चे केले असून, लवकरच भारतात लॉन्चे केले जाणार आहेत. या स्मार्टफोन्सचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे कमी किंमत. LG X5 स्मार्टफोनची किंमत जवळपास 11 हजार 700 रुपये असून, LG X Skin ची किंमत जवळपास 13 हजार 500 रुपये आहे. LG X5 फीचर्स : 5.5-inch (720×1280 पिक्सेल) HD स्क्रीन 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा 2800mAh बॅटरी 2 GB रॅम 1.3GHz क्वाडकोर प्रोसेसर 16 GB इनबिल्ट मेमरी 4G LTE ,ब्लूटूथ, वाय-फाय LG X Skin फीचर्स : 5-inch (720×1280 पिक्सेल) HD स्क्रीन 8 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा 1.5GB रॅम 1.3GHz क्वाडकोर प्रोसेसर 16 GB इनबिल्ट मेमरी 4G LTE ,ब्लूटूथ, वाय-फाय
आणखी वाचा























