एक्स्प्लोर

रिपोर्ट : भविष्यातही जिओ इतर कंपन्यांसाठी धोकादायक

मुंबई : रिलायन्स जिओच्या एकूण 7 कोटी 20 लाख ग्राहकांनी 31 मार्चपर्यंत प्राईम मेंबरशिप घेतल्याने येत्या काळात जिओ इतर दूरसंचार कंपन्यांसाठी धोकादायक ठरेल, असं अंदाज एका संस्थेने वर्तवला आहे. जागतिक गुंतवणूक बँकिंग कंपनी जेफरीजने हा अंदाज वर्तवला आहे. स्वस्त सेवा दिल्याने इतर कंपन्यांना अगोदरच नुकसान झालं आहे. मात्र प्राईम मेंबरशिप घेतलेल्या ग्राहकांची संख्या पाहता आगामी काळातही इतर कंपन्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते, असं जेफरीजने म्हटलं आहे. रिलायन्स जिओच्या 10 कोटी ग्राहकांपैकी 7 कोटी 20 लाख ग्राहकांनी प्राईम मेंबरशीप घेतली आहे, अशी माहिती जिओने नुकतीच एका रिपोर्टमध्ये दिली आहे. काय आहे प्राईम मेंबरशिप ऑफर? 99 रुपयांची प्राईम मेंबरशीप घेतल्यानंतर 303 रुपये प्रति महिना दराने ‘हॅप्पी न्यू ईयर’ ऑफरचा लाभ एक वर्षासाठी म्हणजे 1 एप्रिल 2018 पर्यंत घेता येईल. 31 डिसेंबरला ‘वेलकम ऑफर’ संपल्यानंतर 1 जानेवारीपासून ‘हॅप्पी न्यू ईयर’ ही ऑफर लाँच करण्यात आली होती. ‘हॅप्पी न्यू ईयर’ ऑफरनुसार सध्या ग्राहकांना 31 मार्च पर्यंत प्रति दिन 1GB डेटा आणि मोफत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा आहे. प्राईम मेंबरशीप न घेतल्यास काय होईल? 1 मार्च ते 31 मार्च या काळात प्राईम मेंबरशीपसाठी नोंदणी करता येईल. मात्र मेंबरशीप न घेतल्यास तुमचं जिओ सिम प्रीपेड किंवा पोस्टपेडमध्ये बदलण्यात येईल. त्यानुसार तुम्हाला जिओच्या टेरिफ प्लॅननुसार रिचार्ज करावं लागेल. सप्टेंबर 2016 मध्ये जिओने टेरिफ प्लॅन लाँच केले होते. टेरिफ प्लॅननुसारही व्हॉईस कॉलिंग मोफत असेल, केवळ डेटाचे पैसे मोजावे लागतील. जिओ प्राईम मेंबरशीप कुणाला घेता येईल? जिओच्या प्राईम मेंबरशीपचा लाभ सध्याच्या 10 कोटी ग्राहकांना आणि 31 मार्चपर्यंत नवीन कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना मिळेल. यासाठी नोंदणी प्रक्रिया 1 मार्चला सुरु करण्यात येईल, तर 31 मार्च अंतिम तारीख असेल. प्राईम मेंबरशीपसाठी जिओ युझरला 99 रुपये मोजावे लागतील, तर एक वर्षासाठी ही मेंबरशिप असेल. जिओ प्राईम मेंबरशीप कशी मिळवाल? प्राईम मेंबरशीप जिओच्या वेबसाईटवर किंवा अॅपवरुन मिळवता येईल. शिवाय जिओ स्टोअरमध्ये जाऊनही मेंबरशिप घेता येईल. जिओ प्राईम मेंबरशीपचे फायदे मेंबरशीप घेणाऱ्या ग्राहकांना जिओचे सर्व अॅप एक वर्षासाठी मोफत वापरता येतील. तर जिओच्या सहयोगी कंपन्यांच्या ऑफर्सचाही लाभ घेता येईल, असं अंबानींनी सांगितलं. मेंबरशीप घेतल्यास 303 रुपये प्रतिमहिना दराने 31 मार्च 2018 पर्यंत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि डेटा (1GB प्रतिदिन) वापरता येईल. म्हणजेच आता जिओ वापरण्यासाठी प्रतिदिन 10 रुपये खर्च येणार आहे. संबंधित बातम्या :

जिओ प्राईम मेंबरशिपच्या रजिस्ट्रेशनला सुरुवात, ग्राहकांना काय फायदा?

जिओची प्राईम मेंबरशीप न घेतल्यास काय होईल?

जिओ मार्चनंतर आणखी एक धमाका करण्याच्या तयारीत?

रिलायन्स जिओ 1500 रुपयांहून कमी किंमतीचा 4G स्मार्टफोन लॉन्च करणार?

रिलायन्स जिओ इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्येही नंबर वन!

व्हायरल सत्य : 18 जानेवारीनंतर जिओ सिम बंद होणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget