एक्स्प्लोर
जीप रँग्लर अनलिमिटेडचं नवं मॉडेल लॉन्च, किंमत तब्बल...
मुंबई: अमेरिकन एसयूव्ही मेकर जीपने रँग्लर अनलिमिटेडनं पेट्रोल व्हर्जन लाँच केलं आहे. डिझेल व्हर्जनपेक्षा ही जीप तब्बल 16 लाख रुपये स्वस्त आहे. या नव्या जीपची किंमत तब्बल 56 लाख रुपये आहे. तर डिझेल व्हर्जनची किंमत 71.59 लाख आहे.
पेट्रोल व्हर्जनमध्ये 3.6 लीटरचं पेंटास्टार व्ही6 इंजिन देण्यात आलं आहे. जे 285 पीएस पॉवर आणि 647 एनएम टॉर्क देतं. यात 5 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनही मिळतं.
या जीपमध्ये मॅक किनले लेदर सीट, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, की-लेस एंट्री आणि हँडलॅप्सही असणार आहे.
तसेच इलेक्ट्रॉनिक रोल मिटिगेशन आणि स्टेबिलीटी कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट, तसेच ऑल डिस्क ब्रेकही देण्यात आले आहेत.
या जीपची स्पर्धा बीएमडब्ल्यू एक्स 3 आणि मर्सिडीज जीएलसी सोबत असणार आहे.
सोर्स: कार देखो डॉट कॉम
Source: cardekho.com
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement