Instagram New Feature : इंस्टाग्राम रीलवर आता 90 सेकंदांचा व्हिडिओ बनवता येणार, नवीन फीचर लवकरच लाँच होणार
Instagram Update: इंस्टाग्राम यूजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. कंपनी लवकरच या प्लॅटफॉर्मवर एक भन्नाट फीचर आणणार आहे. या फीचरमधून तुम्हाला रील्ससाठी 90 सेकंदांचा व्हिडिओ बनवण्याचा ऑप्शन दिला जाणार आहे.
Instagram Reels New Feature : फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म म्हणून इंस्टाग्रामची तरूणाईत प्रचंड क्रेझ आहे. याच इन्टाग्रामने छोट्या व्हिडीओचे रिल्स बनवून मार्केटमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यात खूप मेहनत घेतली. इंस्टाग्राम सतत नवीन नवीन फीचर्स घेऊन यूजर्सना आश्चर्यचकित करत असतं. रिपोर्ट्सनुसार, कंपनी इंस्टाग्राममध्ये 90 सेकंदांचा व्हिडिओ बनवण्याचा पर्याय देणार आहे. आतापर्यंत, वापरकर्त्यांना 60 सेकंदांपर्यंत व्हिडिओ बनवण्याचा पर्याय होता.
सध्या टेस्टिंग सुरू आहे, लवकरच लॉन्चिंगच्या मार्गावर
रिपोर्ट्सनुसार, मेटा (Meta) मालकीचे इंस्टाग्राम गेल्या काही दिवसांपासून आपल्या रील सेगमेंटसाठी 90 सेकंदांपर्यंतचे व्हिडिओ बनवण्याच्या फीचरवर काम करत आहे. याची टेस्टिंग सध्या सुरु आहे. हे नवीन फीचर लवकरच सर्व यूजर्ससाठी रिलीज करणार असल्याचे सांगितले जात आहे. हे फीचरमधून तुम्ही इंस्टाग्राम रील्सवर 90 सेकंदांचा व्हिडिओ बनवू आणि टाकू शकाल. अलिकडच्या काळात इंस्टाग्रामने रील सेग्मेंटमध्ये अनेक नवीन फिचर्स जारी केले आहेत. यात कॅप्शन टू रीमिक्सचा ऑप्शनदेखील उपलब्ध आहे. आणखी बरेच फीचर्स सध्या टेस्टिंगमध्ये आहेत, जी येत्या काही महिन्यांत रिलीज होऊ शकतात.
सध्या हे ऑप्शन्स आहेत :
Instagram Reels वर, तुम्हाला सध्या 15 सेकंद आणि 60 सेकंदांपर्यंतचे व्हिडिओ अपलोड करण्याचा ऑप्शन मिळतो. कंपनीने गेल्या वर्षी 60 सेकंदांपर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा ऑप्शन दिला होता. लहान व्हिडिओमध्ये फेमस असलेलं टिकटॉक आणि इतर अॅप्सशी स्पर्धा करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Instagram New Feature : इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आता 3D अवतार, लवकरच येणार नवं फीचर
- EV Charging Station : सहज उभारता येईल इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन, 'या' पोर्टलवर मिळणार परवाना
- मारुती सेलेरियो आणि वॅगनआर मध्ये जबरदस्त स्पर्धा, जाणून घ्या कोणती कार आहे दमदार?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha