इन्स्टाग्रामवर आता 4 तासांसाठी करा लाईव्ह व्हिडीओ; युजर्ससाठी इन्स्टाचे खास फिचर्स
इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी काही खास अपडेट्स घेऊन आलं आहे. यामध्ये आता युजर्स एका तासाऐवजी 4 तासांसाठी इन्स्टाग्रामवरुन लाईव्ह करु शकणार आहेत.
मुंबई : सोशल मीडियामध्ये फेसबुकनंतर इन्स्टाग्राम सर्वात लोकप्रिय आहे. खासकरुन मोठ्या शहरांमधील तरुण वर्ग इन्स्टाग्रामवर फार अॅक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळतं. यावर्षी कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. तेव्हापासून इन्स्टाग्रामच्या युजर्समध्ये आणखी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. इन्स्टाग्रामचा वाढता ट्रेंड पाहता कंपनीही यामध्ये नवे फिचर्स लॉन्च करत आहे.
इन्स्टाग्रामने आपल्या ट्विटर हँडलवरुन माहिती दिली की, लाइव्ह व्हिडीओमध्ये नवीन फिचर्स युजर्ससाठी लॉन्च करण्यात आले आहेत. इन्स्टाग्राम लाईव्ह व्हिडीओ आता तासांपर्यंत सुरु राहणार आहे. म्हणजेच, आतापर्यंत इन्स्टाग्राम युजर्स एक तासापर्यंत लाइव्ह करु शकत होते. पण आता इन्स्टाग्राम लाइव्हसाठी टाईम लिमिट वाढवून तासांसाठी करण्यात आला आहे. हे एक उत्तम फिचर आहे. ज्या व्यक्ती लाईव्ह सेशन करतात, त्यांना एक उत्तम टाईम लिमिट मिळाला आहे.
🌟3 updates about Live🌟 🎥You can now go Live for up to 4 hours 🎞You can save your Lives for 30 days before they delete 📺 You’ll start seeing a “Live Now” section in the IGTV app and on Explore so you can discover more Lives pic.twitter.com/0wipQJXr1F
— Instagram (@instagram) October 27, 2020
दुसरा फिचरही लाईव्ह व्हिडीओशी संबंधित आहे. इन्स्टाग्राम युजर्स आपल्या लाईव्ह व्हिडीओला दिवसांपर्यंत सेव्ह करुन ठेवू शकणार आहेत. इन्स्टाग्रामने युजर्सना त्यांचा लाईव्ह व्हिडीओ डिलीच होण्याआधी दिवसांपर्यंत सेव्ह करण्याचा ऑप्शन देण्यात आला आहे. हा व्हिडीओ तुम्हाला लाईव्ह अर्काइव्हमध्ये मिळेल आणि हा केवळ तुम्हीच पाहू शकता. जर एक महिन्याच्या आत तुम्ही हा व्हिडीओ सेव्ह केला नाही, तर हा व्हिडीओ आपोआप डिलीट होणार आहे. तुम्ही हा व्हिडीओ एक महिन्याच्या आत IGTV मध्ये अपलोड करु शकता.
इन्स्टाग्राममध्ये एक्सप्लोर सेक्शनही अॅड करण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त IGTV अॅपमध्ये एक नवं फिचर लाईव्ह नाऊ देण्यात आलं आहे. लाईव्ह नाऊ सेक्शन IGTV आणि व्हिडीओ फॉर यू यांसारख्या दुसऱ्या सेक्शनसोबत एक्सप्लोर पेजच्या टॉपवर देण्यात आलं आहे. एक्सप्लोर बटन आता नव्या मेसेंजर बटनच्या साईडला स्क्रिनच्या टॉप-राईट कॉर्नरमध्ये आहे.महत्त्वाच्या बातम्या :