(Source: Poll of Polls)
फेसबुकचा नवा क्लॉऊड गेम लॉन्च, वेबसाईट आणि अँड्रॉईड अॅपवर उपलब्ध, अॅपलला वगळले!
फेसबुकने डेस्कटॉप वेबसाईट आणि अँड्रॉईड अॅपवर नवीन क्लॉऊड गेम लॉन्च केला आहे. परंतु ही सेवा अॅपलच्या युझर्सना मिळणार नाही.
मुंबई : फेसबुकने डेस्कटॉप वेबसाईट आणि अँड्रॉईड अॅपवर नवीन क्लॉऊड गेम लॉन्च केला आहे. परंतु ही सेवा अॅपलच्या युझरना मिळणार नाही. अॅपलसोबत सुरु असलेल्या वादामुळे फेसबुकने हा निर्णय घेतला आहे. आता फेसबुकच्या पेजमधून बाहेर न पडताही युझरना गेम खेळता येणार आहे.
फेसबुकने सोमवारी वेबसाईट युझर्ससाठी मोफत क्लाऊड गेम लॉन्च केला आहे. फेसबुकचा हा नवा गेम फेसबुक वेबसाईट आणि अँड्रॉईड अॅपवर उपलब्ध असेल पण तो अॅपलवर उपलब्ध नसेल. अॅपलच्या काही धोरणांमुळे तो त्यांना उपलब्ध करता येत नाही, असेही फेसबुकने स्पष्ट केले आहे.
फेसबुकचे अँड्रॉईड आणि वेबसाईटचे युझर आता आपल्या सोशल मीडियाच्या पेजवरुन बाहेर न पडता अवघ्या काही सेकंदातच हा गेम खेळू शकणार आहेत. फेसबुक युझर त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुनच हा गेम खेळण्याचा आनंद घेऊ शकतात. ही कल्पना मायक्रोसॉफ्ट आणि गुगलच्या सेवेसारखीच आहे परंतु या कंपन्यांनी पुरवलेल्या कन्सोल-क्वॉलिटीचा यात अभाव आहे.
☁ ????????
So... what IS 'cloud gaming', anyway? Is it replacing your console with a controller and a subscription? For some, maybe. Or...maybe you could grab your phone. Open an app. Find a game. Play it. No controllers. No subscriptions. — Facebook Gaming (@FacebookGaming) October 26, 2020
फेसबुकने लॉन्च केलेला हा गेम मोबाईल व्हर्जनमध्ये आहे. Asphalt 9: Legends हा गेम 3D रेसर गेम आहे. PGA TOUR Golf Shootout हा 3D गोल्फिंग गेम आहे. युझर माऊस, की-बोर्ड अथवा टचस्क्रीनचा वापर करुन अगदी मोफतपणे ही गेम खेळू शकतात. कोणतेही शुल्क लावण्यात येत नसल्याने या गेमचा प्रसार मोठ्या प्रमाणात होण्याची आशा फेसबुकला आहे.
हा गेम खेळताना फेसबुकच्या पेजमधून बाहेर पडण्याची गरज नसल्याने युझर फेसबुकच्या पेजवरच राहतील आणि त्याचा उपयोग कंपनीला त्यांचा प्रति व्यक्ती महसूल वाढीसाठी होणार आहे. तसेच जाहिरातीही त्या पेजवर सुरुच राहिल्याने फेसबुकच्या जाहिरातींमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. फेसबुकचा 98 टक्के महसूल हा त्यांना मिळणाऱ्या जाहिरातीमधून मिळतो.
या आठवड्यात अमेरिकेच्या काही भागात म्हणजे फेसबुकच्या डाटा सेंटरच्या जवळच्या भागात ही सेवा सुरु करण्यात येणार आहे. त्यानंतर महिन्याभराच्या कालावधीत त्याचा विस्तार करण्यात येणार असल्याचे फेसबुकने सांगितले आहे.
फेसबुकच्या या गेमचा वापर अॅपलच्या युझर्सना करता येणार नाही. फेसबुक आणि अॅपल या दोन कंपन्यादरम्यानच्या दीर्घकालीन वादाचा प्रभाव या निर्णयावर पडला असल्याचं सांगण्यात येतंय.
या दोन कंपन्यामधील या वादाला 2018 साली सुरुवात झाली होती. अॅपलचे सीईओ टीम कुक यांनी फेसबुकवर युझरच्या प्रायव्हसी डेटावरुन टीका केली होती. केम्ब्रिज अॅनॅलिटिका प्रकरणात जवळपास 87 दशलक्ष फेसबुक युझर्सच्या माहितीवर अवैधपणे डल्ला मारल्याचं स्पष्ट झालं होतं.