(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Festival Sale : फ्लिपकार्टच्या दिवाळी सेलमध्ये स्मार्टफोन्सवर मोठा डिस्काउंट; कमी किमतीत खरेदी करा फोन
Festival Sale : सध्या सर्व ई-कॉमर्स कंपन्यांच्या वेबसाईट्सवर सेल सुरु आहे. अशातच आता फ्लिपकार्टचा दिवाळी सेलही लवकरच सुरु होणार आहे.
मुंबई : यंदाच्या फेस्टिव्ह सीझनमध्ये ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवर सेल सुरु आहे. याआधी सुरु असलेल्या बिग बिलियन डेज सेलमध्ये कस्टमर्सनी बक्कळ खरेदी केली. अशातच आता फ्लिपकार्टचा दिवाळी सेलही सुरु होणार आहे. 29 ऑक्टोबरपासून सुरु होणारा हा सेल 4 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये स्मार्टफोन्ससह इतरही अनेक प्रोडक्ट्सवर ग्राहकांना मोठी सूट मिळणार आहे. आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोणत्या स्मार्टफोनवर या सेलमध्ये सर्वाधिक डिस्काउंट देण्यात येत आहे.
Samsung Galaxy M51
फ्लिपकार्टच्या दिवाळी सेलमध्ये सॅमसंगचा हा स्मार्टफोन तुम्हाला 24,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत मिळेल. या फोनमध्ये AMOLED डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 730G प्रोसेसर आणि 7,000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. त्यामुळे हा फोन सेलमध्ये खरेदी करणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल.
Vivo V20
फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये विवोचा हा फोन तुम्ही 24,990 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करु शकता. याव्यतिरिक्त येथे एक्सचेंज अंतर्गत 2,500 रुपयांचा एक्स्ट्रा डिस्काउंटही देण्यात येत आहे. Vivo V20 मध्ये AMLOED डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर आणि 44MP फ्रंट कैमरा देण्यात आला आहे.
LG G8X
LG चा हा फोन तुम्ही सेलमध्ये 24,990 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. हा एक ड्युअल स्क्रिन फोन आहे, ज्यामध्ये स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर देण्यात आला आहे. जर तुम्ही हा फोन खरेदी करण्याचा प्लान करत असाल तर तीन नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता हा फोन ऑर्डर करू शकता.
Poco X2
पोकोचा हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट सेलमध्ये 16,499 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. यामध्ये स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 730G प्रोसेसर, 120Hz डिस्प्ले आणि 64MP क्वॉड कॅमरा सेटअप देण्यात आला आहे.
Motorola One Fusion+
जर तुम्हाला या फेस्टिव्ह सीझनमध्ये मोटोरोलाचा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही Motorola One Fusion+ या सेलमध्ये खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन 16,499 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. या फोनमध्ये 64MP क्वॉड कॅमरा सेटअप आणि स्नॅपड्रॅगन 730G प्रोसेसर देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :