(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Infinix कंपनीकडून दोन गेमिंग स्मार्टफोन्स बाजारात, नोट 11 आणि नोट 11एस लॉन्च
Infinix Smartphones : इन्फिनिक्स कंपनीच्या नोट 10 सिरीजला मिळालेल्या भव्य यशानंतर इन्फिनिक्स स्मार्टफोन ब्रॅण्ड आता भारतामध्ये बहुचर्चित नोट 11 सिरीज लॉन्च करत आहे.
Infinix Smartphones : सध्या आपण सारे स्मार्टफोनवर इतके अवंलंबून असतो, की त्याच्याशिवाय जगणंच जणू अवघड झालं आहे. त्यात बच्चे कंपनीसह युवा वर्ग गेम खेळण्यासाठी मोबाईल फोनचा फार वापर करत असतो. त्यामुळे इन्फिनिक्स ही मोबाईल कंपनी गेमिंग स्मार्टफोन बाजारात घेऊन येत असते. नुकत्याच नोट 10 सिरीजला मिळालेल्या भव्य यशानंतर इन्फिनिक्स हा ट्रान्सियॉन ग्रुपचा प्रिमिअम स्मार्टफोन ब्रॅण्ड आता भारतामध्ये बहुचर्चित नोट 11 सिरीजचे अनावरण करत आहे. प्रिमिअम गेमिंग फोन्स म्हणून आपले स्थान प्रबळ करणारा नोट 11एस 20 डिसेंबरपासून अनुकमे 12 हजार 999 आणि 14 हजार 999 रूपयांना फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल. तसेच नोट 11 23 डिसेंबरपासून 11 हजार 999 रूपये या सुरूवातीच्या किंमतीमध्ये उपलब्ध असेल.
नोट 11 आणि नोट 11एस या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये आधुनिक टेक्नोलॉजी, उच्च दर्जाचे गेमिंग तंत्रज्ञान, शक्तिशाली प्रोसेसर आणि दमदार क्षमतेची बॅटरी असणार आहे. ज्यामुळे या फोनच्या वापरकर्त्यांना स्मार्टफोनचा आनंद घेण्यासह गेमिंगचा आनंदही मोठ्या प्रमाणात घेता येईल. नोट 11 चा 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज वाला ग्लेशियर ग्रीन, सेलेस्टियल स्नो, ग्रॅफाईट ब्लॅक या तीन रंगांच्या व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध असेल. नोट 11एस 6 जीबी रॅम / 64 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम / 128 स्टोरेज या दोन पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. य़ामध्येही सिम्फोनी सियान, हेझ ग्रीन आणि मिथ्रिल ग्रे हे तीन आकर्षक रंग उपलब्ध असतील.
असा असेल लूक
इन्फिनिक्सचा नोट सिरीजमधील हा नवीन स्मार्टफोन नोट 11 6.7 इंच एफएचडी+ एएमओएलईडी डिस्प्ले असलेला स्मार्टफोन क्षेत्रातील पहिलाच फोन असेल. यामधून हाय रेझॉल्युशन किंवा 4के व्हिडिओज पाहताना स्क्रिनवर आकर्षक रंगसंगती निर्माण होण्याची खात्री मिळेल. नोट 11एस मध्ये 6.95 इंच पंच-होल एफएचडी+ डिस्प्ले आहे, ज्यात १२० हर्टझचे अल्ट्रा-स्मूद रिफ्रेश रेट दे असून ज्यामधून गेमर्ससाठी युजर्सच्या हाताची बोटे व स्क्रिनदरम्यान अत्यंत सुलभ इंटरॅक्शन होण्याची खात्री मिळते.
आधुनिक तंत्रज्ञान
प्रो-लेव्हल गेमर्सच्या सर्व गरजा लक्षात घेत इन्फिनिक्स नोट 11 मध्ये प्रगत मीडियाटेक हेलिओ जी88 प्रोसेसर आहे. किफायतशीर दरातील विभागामध्ये असे शक्तिशाली प्रोसेसर असलेले भारतातील हे तिसरे डिवाईस आहे. या शक्तिशाली प्रोसेसरची सीपीयू गती जवळपास 2 गिगाहर्ट्झ आहे. नोट 11एस शक्तिशाली मीडियाटेक हेलिओ जी96 प्रोसेसर असलेला या विभागातील दुसरा डिवाईस आहे. ज्यामधून उच्च दर्जाच्या गेमिंग कार्यक्षमतेची खात्री मिळते. गेमिंग कार्यक्षमता नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी दोन्ही डिवाईसेसमध्ये डार-लिंक २20. गेम बूस्ट तंत्रज्ञान आहे. तसेच दोन्ही डिवाईसेसमध्ये युनिक सुपरकूल यंत्रणा आहे.
नोट 11 फोनमधील ट्रिपल कॅमेरा सेटअपसह 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा लेन्स, एफ/1.6 लार्ज अर्पेचर, परिपूर्ण पोर्ट्रेट फोटोज कॅप्चर करण्यासाठी सेकंडरी लेन्ससह 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आणि एआय लेन्ससह क्वॉड एलईडी फ्लॅश आहे. नोट 111एस मध्ये ५० मेगापिक्सल एआय ट्रिपल रिअर कॅमेरासह समर्पित 2 मेगापिक्सल माक्रो लेन्स, 2 मेगापिक्सल डेप्थ लेन्स आणि क्वॉड-एलईडी फ्लॅश आहे. दोन्ही डिवाईसच्या पुढील बाजूस 16 मेगापिक्सल एआय सेल्फी कॅमेरासह ड्युअल-एलईडी फ्लॅशही आहे. तर बॅटरी क्षमता 5 हजार एमएएच बॅटरी आहे.
हे ही वाचा
- Bulletproof iPhone : बंदुकीच्या गोळीचाही सामना करणार Bulletproof iPhone 13, जाणून घ्या किंमत
- Airtel Jio Vi : दररोज 1.5GB डेटा अन् अनलिमिटेड कॉलिंगचे 'हे' प्लान, कोणता योग्य?
- 5G नेटवर्कपासून बचाव करणारे प्रोडक्ट्सच हानिकारक, योग्य माहितीशिवाय वापरणं धोकादायक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha