(Source: Poll of Polls)
Search Engine Google : स्पेलिंग मिस्टेकमुळे मिळालं Google हे नाव, दोघांनी सुरु केली कंपनी; गुगलचा रंजक इतिहास माहितेय?
Search Engine Google : गुगलचं नाव BackRub असं ठेवण्यात येणार होतं. त्यानंतर Googol असे ठेवण्यात आलं. पण स्पेलिंगमधील चुकीमुळे सर्च इंजिनचं नाव Google असं नामकरण झालं.
Google Search Engine : गुगल (Google) जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन (Search Engine) आहे. कोणतीही गोष्ट गुगलवर सर्च केल्यावर अगदी काही सेकंदांमधअये तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळते. पण तुम्हाला गुगल आणि त्याचा रंजक इतिहास माहित आहे का? नसेल तर आम्ही तुम्हाला गुगलचा शोध आणि त्याच्या नावामागचा इतिहास याबद्दल माहिती देणार आहोत. गुगलला त्याचं नाव स्पेलिंगमधील चुकीमुळे मिळालं आहे, सर्च इंजिनचं नाव आधी वेगळं ठेवण्याचं ठरलं होतं.
गुगलची सुरुवात कधी झाली? (When was Google Started?)
गुगल सर्च इंजिन अधिकृतरित्या 4 डिसेंबर 1998 पासून सुरु करण्यात आलं. दरम्यान याच्या दोन वर्षाआधीच या सर्च इंजिन प्रोजेक्टची सुरुवात करण्यात आली होती.
गुगल हे नाव कसं मिळालं? (How Google got its Name?)
या सर्च इंजिनला गुगल हे नाव मिळण्यामागेही वेगळं कारण आहे. सुरुवातीला याचं नाव BackRub असं ठेवण्यात येणार होते. त्यानंतर Googol असं नाव ठेवण्याचं ठरवण्यात आलं. पण स्पेलिंग मिस्टेकमुळे सर्च इंजिनला Google हे नाव मिळालं.
गुगलचा शोध कुणी लावला? (Who Invented Google?)
स्टॅनफोर्ड विद्यापीठातील दोन पीएचडीच्या विद्यार्थ्यांनी गुगलचा शोध कुणी लावला. सर्जी ब्रिन आणि लॅरी पेज यांनी एक प्रोजेक्ट म्हणून या सर्च इंजिनची सुरुवात केली होती. हे सर्च इंजिन सुरुवातील BackRub म्हणून ओळखलं जात होतं. पण नंतर त्याचे नाव बदलून गुगल करण्यात आलं. गुगलच्या डोमेनची 15 सप्टेंबर 1997 रोजी अधिकृत नोंदणी करण्यात आली.
Google चे CEO कोण आहेत? (Chief Executive Officer of Google)
सुंदर पिचाई (Sundar Pichai) हे सध्या गुगलचे सीईओ आहेत. सुंदर पिचाई हे भारतीय वंशाचे आहेत, ते 2004 मध्ये गुगलमध्ये रुजू झाले. 2014 मध्ये सुंदर पिचाई यांना Google चे CEO म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. सुंदर पिचाई यांचं वार्षिक उत्पन्न सुमारे 1720 कोटी आहे.
Google चा वापर काय आहे?
गुगल हे एक सर्च इंजिन (Search Engine) आहे, ज्यावर माहितीचा साठा आहे. गुगलवर कोणतीही माहिती तुम्हाला एका क्लिकवर उपलब्ध होते. तुम्ही गुगलवर काहीही शोधू शकता आणि Google तुम्हाला सर्वात अचूक माहिती पुरवते. यामुळेच गुगलला जगातील सर्वोत्तम सर्च इंजिन म्हटलं जातं. गुगलची एका दिवसाची कमाई सुमारे 5 अब्जांपेक्षा जास्त आहे.