एक्स्प्लोर
जीएसटीनंतर स्मार्टफोन विक्रीवर काय फरक पडला?
जीएसटी लागू झाल्यानंतर स्मार्टफोन खरेदीवर त्याचा परिणाम होणार का याची चर्चा बरेच दिवस सुरु होती. एका रिपोर्टमधून याबाबतची काही माहिती समोर आली आहे.
लंडन : भारतात दरवर्षी मोबाइल फोनच्या मागणीत प्रचंड वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) लागू झाल्यानंतरही स्मार्टफोनच्या मागणीत काहीही परिणाम झालेला नाही. जगप्रसिद्ध रिसर्च फर्म जीएफकेने याबाबत माहिती दिली आहे. याबाबतच्या रिपोर्टमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, 'भारतात स्मार्टफोनची मागणी बरीच आहे. 2017मधील दुसऱ्या त्रैमासिकात देखील मागणीत वाढ असल्याचं दिसून आलं आहे.'
सध्या आशियात स्मार्टफोनची मागणी जास्त आहे. यंदा यात 13 टक्के वाढ दिसून येत आहे. यामध्ये बांगलादेश आणि मलेशियात सर्वात आघाडीवर असल्याचं दिसून आलं आहे.
या रिपोर्टनुसार, 'बांगलादेशमध्ये स्मार्टफोनच्या मागणीत तब्बल 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर मलेशियामध्ये 31 टक्क्यांनी वाढ झाली आहे.'
दरम्यान, भारतात जीएसटी लागू झाल्यानंतरही स्मार्टफोनच्या मागणीत कोणतीही घट अद्याप झालेली नाही. या वर्षात आतापर्यंत 23.4 कोटी स्मार्टफोनची विक्री झाली आहे. म्हणजेच दरवर्षीच्या तुलनेत 11 टक्क्यांनी यात वाढ झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement