एक्स्प्लोर
भारतात आता गूगल, ट्विटर, फेसबुकवरही टॅक्स
नवी दिल्ली : 1 जून 2016 पासून भारतात गूगल, फेसबुक, याहू आणि ट्विटर या सोशल साईट्सवरही टॅक्स लागू होणार आहे. सोशल साईट्सच्या माध्यमातून मिळमाऱ्या उत्पन्नावर 6 टक्के टॅक्स आकारला जाणार आहे.
गूगल कंपनीचा भारतातील वार्षिक उत्पन्न सुमारे 4 हजार कोटींहून अधिक आहे, तर फेसबुकचं भारतातील वार्षिक उत्पन्न सुमारे 125 कोटींच्या जवळपास आहे.
सरकार या सोशल साईट्सच्या भारतातील उत्पन्नांवर 6 टक्के टॅक्स आकारणार असून, यासंबंधी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. खरंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पातच याबाबत घोषणा केली होती.
इक्वलायजेशन लेव्ही नावाने हा टॅक्स असून, एक लाखाहून अधिक उत्पन्न असणऱ्या कंपन्यांना हा टॅक्स लागू असेल.
इक्वलायजेशन टॅक्स लागू झाल्यानंतर भारत हा असा पहिला देश असेल, जो सोशल साईट्स कंपन्यांवर टॅक्स आकरण्यास सुरुवात करतो आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement