Google : जबरदस्त साऊंट सिस्टीमसह Google Pixel Buds Pro भारतात लॉन्च; वाचा किंमत आणि फिचर्स
Google Pixel Buds Pro Launch : Google ने भारतीय बाजारात Pixel Buds Pro लॉन्च केला आहे. त्याचबरोबर Google ने या बड्सबरोबरच Google Pixel 6a स्मार्टफोनसाठी प्री-ऑर्डर देखील सुरू केल्या आहेत.
Google Pixel Buds Pro Launch : गुगल (Google) आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळे फिचर अपडेट करत असतात. त्याचप्रमाणे नवीन प्रोडक्टसुद्धा लॉन्च केले जातात. नुकताच Google ने भारतीय बाजारात Pixel Buds Pro लॉन्च केला आहे. त्याचबरोबर Google ने या बड्सबरोबरच Google Pixel 6a स्मार्टफोनसाठी प्री-ऑर्डर देखील सुरू केल्या आहेत. Google Pixel Buds Pro खरंतर एक्टिव्ह नॉईस कॅन्सलेशन (ANC) आणि सहा-कोर ऑडिओ चिपसह सुसज्ज आहे. ही चीप गुगलने स्वत: तयार केलेल्या अल्गोरिदम वर चालते.
Google Pixel Buds Pro हे Google ने Pixel Buds आणि Pixel Buds A-सिरीजच्या सक्सेसरच्या आधारावर लॉन्च करण्यात आला आहे. या बड्समध्ये ट्रान्सपरन्सी मोड देण्यात आला आहे. जो चांगला आवाज देतो. Google Pixel Buds Pro मध्ये आणखी कोणती वैशिष्ट्ये आहेत हे जाणून घ्या.
Google Pixel Buds Pro Specification :
- Google Pixel Buds Pro मध्ये एक्टिव्ह नॉईस कॅन्सलेशन (ANC) आणि चांगली साऊंड सिस्टीम देण्यात आली आहे.
- ही Google द्वारे लॉन्च करण्यात आलेली सहा-कोर ऑडिओ चिप आहे.
- हँड्स फ्री गुगल असिस्टंट फीचर देखील देण्यात आले आहे.
- ANC शिवाय 31 तासांचा प्लेबॅकसुद्धा उपलब्ध आहे.
- Google Pixel Buds Pro चा केस USB C-Type ने चार्ज केला जाऊ शकतो.
- Qi वायरलेस चार्जिंगची सुविधाही आहे.
- Google Pixel Buds Pro मल्टीपॉइंट कनेक्टिव्हिटीसह येतो, जो एकाच वेळी अनेक डिव्हाईसशी कनेक्ट केला जाऊ शकतो.
- Google Pixel Buds Pro मध्ये ब्लूटूथ v5.0 समर्थित आहे.
- Android आणि iOS सह टॅब्लेट आणि लॅपटॉपशी देखील कनेक्ट केले जाऊ शकते.
Google Pixel Buds Pro ची किंमत :
गुगल पिक्सेल बड्स प्रो चारकोल, कोरल, फॉग आणि लेमनग्रास या चार कलर ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. Google Pixel Buds Pro ची किंमत 19,990 रुपये आहे. आणि 28 जुलैपासून हा बाजारात उपलब्ध असेल.
महत्वाच्या बातम्या :