एक्स्प्लोर

Google : गुगलच्या 15 ॲपमध्ये मोठे बदल, जाणून घ्या अपडेट्सबाबत सविस्तर माहिती

Google IO 2022 : गुगल आता अँड्रॉइड टॅबलेटसाठी 15 महत्त्वाच्या ॲपमध्ये मोठे बदल करणार आहे. जाणून घ्या याबाबत सविस्तर.

Google I/O 2022 : नुकतीच गुगलची Google I/O 2022 परिषद पार पडली. यामध्ये गुगगने अनेक मोठ्या घोषणा आणि नवीन उत्पादनं लाँच केली आहेत. महत्त्वाचं म्हणजे गुगलने त्याच्या ॲपमधील अपडेटबाबत मोठी घोषणा केली आहे. गुगल त्याच्या 15 ॲपमध्ये मोठे बदल करणार आहे. अँड्रॉईड उपकरणांमधील अनुभव आणखी प्रगत बनवण्याचं गुगलचं उद्दीष्ट आहे. गुगलने मोठ्या टॅबलेटना लक्ष्य केलं असून टॅबलेटचा वापर आणखी प्रगत करण्याचा गुगलचा विचार आहे. या पार्श्वभूमीवर गुगल टॅबलेटमधील 20 हून अधिक महत्त्वाच्या ॲपमध्ये मोठे बदल आणि अपडेट करणार आहे.

गुगल 15 ॲपमध्ये खालीलप्रमाणे बदल करणार आहे. हे ॲप आणि यामधील बदल काय असतील जाणून घ्या.

1. गुगल फाईल्स (Google Files)
अँड्रॉइडमधील फाइल्स ॲपमध्ये एक चांगली नेव्हिगेशन सिस्टीम असेल. यामध्ये उभ्या इंटरफेसचा (Vertical Interface) वापर केला जाईल, यामुळे टॅब्लेटवर याचा वापर करणं सोपे होईल.

2. गुगल कॅल्क्युलेटर (Google Calculator)
अँड्रॉइडवरील कॅल्क्युलेटर ॲपमध्ये दोन-कॉलम व्ह्यू असेल, यामुळे याला एक वेगळा लूक येईल.

3. गुगल नकाशे (Google Maps)
अँड्रॉइड टॅब्लेटवरील नकाशेमध्ये स्प्लिट कॉलम व्ह्यू आहे परंतु आता Google अधिक चांगला ऍक्सेस देण्यासाठी स्क्रीनच्या खाली भागात असणारा बार आता डावीकडे हलवण्यात येईल.

4. Family Link ॲप
फॅमिली लिंक ॲपवरील नेव्हिगेशन ड्रॉवर आता एक वेगळा लूक असेल.

5. युट्यूब (YouTube)
YouTube चे सध्याचे वर्जन टॅब्लेटसाठी उत्तमप्रकारे काम करत असल्यामुळे यामध्ये फारसा बदल करण्यात येणार नाही.

6. Google Duo
गुगलच्या व्हिडीओ कॉलिंग ॲपमध्ये मोठ्या स्क्रीन उपकरणांसाठी अधिक लक्ष्य ठेवून नियंत्रण करण्यासाठी पर्याय असतील.

7. गूगल भाषांतर (Google Translate)
Google Translate मध्येही बदल करण्यात येणार आहे. या ॲपमध्ये कोणते बदल केले जातील हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

8. गुगल क्रोम (Google Chrome)
Google Chrome टॅब्लेटवर उत्तम काम करते आणि याचा अनुभव डेस्कटॉपसारखाच आहे. आता Google टॅब्लेटवर Chrome वर मल्टीटास्किंग अधिक चांगल्याप्रकारे करेल.

9. जीमेल (Gmail)
टॅब्लेटवर युजर्सना आता त्यांचे फोल्डर्स आणि Gmail मधील लेबल्ससाठी वरच्या बाजूला एक ड्रॉवर बटण असेल.

10. गुगल फोटो (Google Photos)
टॅबलेटच्या चांगल्या अनुभवासाठी Google Photos अलिकडेच पुन्हा डिझाइन केलं गेलं आहे. गुगल येत्या काही महिन्यांत त्यात आणखी काही बदल करू शकते.

11. Google One
Google One ॲप नेव्हिगेशन ड्रॉवरमध्ये एक बदल दिसेल.

12. गुगल मेसेज (Google Messages)
गुगल मेसेज या अँड्रॉइडच्या मूळ मेसेजिंग ॲपला इतर फिचर्ससह दोन-कॉलम व्ह्यू मिळेल.

13. YouTube Music
YouTube वरील प्लेलिस्टला डबल-कॉलम व्ह्यू मिळेल आणि नेव्हिगेशन रेल असेल. यामुळे स्क्रीनवर कमी जागा व्यापली जाईल.

14. गुगल लेन्स (Google Lens)
अँड्रॉइड टॅबलेटसाठी गुगल लेन्स अधिक चांगल्या प्रकारे ऑप्टिमाइझ केलं जाईल. सध्या पोर्ट्रेट ओरिएंटेशनवर व्हिज्युअल सर्च उपलब्ध आहे. यावर्षाच्या शेवट गुगलकडून यामध्ये आणखी बदल करण्यात येण्याची अपेक्षा आहे.

15. गुगल कॅलेंडर (Google Calendar)
टॅब्लेटवर गुगल कॅलेंडर चांगल्याप्रकारे काम करत आहे. यामध्ये कोणते बदल करण्यात येतील याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget