एक्स्प्लोर

Google I/O 2022 मध्ये नवीन प्रोडक्ट लाँच, काय आहेत फिचर्स, जाणून घ्या...

Google IO 2022 : गुगलच्या I/O 2022 परिषदेत अनेक नवीन उत्पादनं लाँच करण्यात आली होती. या सर्व उत्पादनांबद्दल आणि त्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल वाचा सविस्तर...

Google I/O 2022 : Google ने आपल्या वार्षिक परिषदेत अनेक नवीन उत्पादनं लाँच केली आहेत. यामध्ये स्मार्टफोन्सपासून इअरबड्सपर्यंत अनेक वस्तूंचा समावेश आहे. या प्रोडक्टचे फिचर्स आणि किंमत I/O 2022 दरम्यान समोर आली आहे. या कार्यक्रमामध्ये, Google Pixel 6a, Pixel Watch, Pixel Earbuds, Android 13, सिक्युरिटी अपडेट्स, नवीन अॅप्लिकेशन्स आणि Google Wallet सारखी उत्पादने आणि त्यांचे फिचर्स लाँच करण्यात आले. पाहा यांची यादी.

Google Pixel 6a
हा स्मार्टफोन Pixel 6 चे बजेट फ्रेंडली मॉडेल आहे. या स्मार्टफोनमध्ये गुगलची स्वतःची टेन्सर चिप, 6.1 इंचाचा डिस्प्ले, 12 मेगापिक्सेलचा ड्युअल रियर कॅमेरा असेल. याच्या अपडेट व्हेरियंटमध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल. या स्मार्टफोनमध्ये रिसायकल अॅल्युमिनियम फ्रेमचा वापर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत जवळपास 35 हजार रुपये आहे. या स्मार्टफोनची विक्री 21 जुलैपासून सुरू होणार आहे.

पिक्सेल वॉच (Pixel Watch)
हे स्मार्टवॉच Pixel 7 आणि Pixel 7 Pro सोबत लाँच करण्यात आलं आहे. या स्मार्टवॉचमध्ये तुम्हाला गुगल मॅप्स, गुगल वॉलेट आणि गुगल होम सारखे फिचर्स पाहायला मिळतील. या स्मार्टवॉचमध्ये सॅमसंग Exynos 9110 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. याच्या किंमतींबाबत अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.

Google I/O 2022 मध्ये नवीन प्रोडक्ट लाँच, काय आहेत फिचर्स, जाणून घ्या...

अँड्रॉईड 13 (Android 13)
या कार्यक्रमात Android 13 चं बीटा व्हर्जन लाँच करण्यात आलं आहे. Android 13 मध्ये, तुम्हाला पूर्वीपेक्षा चांगली सिक्युरिटी सेटिंग्ज मिळतील. तुम्हाला यामध्ये वेगवेगळ्या भाषाही वापरता येतील. Android 13 मोठ्या स्क्रीन डिव्हाइसवर वापरण्यासाठी अनुकुल केले आहे. गुगलही आपलं 20 अॅप्लिकेशन अपडेट करणार आहे. कंपनीने गुगल वॉलेट देखील अपडेट केलं आहे. गुगलनं म्हटलं आहे की, आता गुगल वॉलेट केवळ क्रेडिट कार्डच नाही तर सरकारनं जारी केलेलं ओळखपत्र, विद्यार्थी ओळखपत्र, लसीकरण ओळखपत्र आणि ड्रायव्हिंग लायसन्स देखील पाहता येईल. 

पिक्सेल इअरबड्स (Pixel Earbuds)
हे Google चे पहिले ANC (Active Noise Cancellation) इयरबड्स आहेत. या इअरबड्सच्या मदतीने तुम्हाला आवाज स्पष्टपणे ऐकू येईल असा गुगलचा दावा आहे. Pixel Buds Pro इयरबड्स हा Pixel Buds आणि Pixel Buds A-Series चं अपग्रेड वर्जन आहे. यात ब्लूटूथ 5.0 साठी देखील सपोर्ट आहे. तुम्ही हे इअरबड एका चार्जवर 31 तास वापरू शकता. तुम्ही 21 जुलैपासून ते ऑर्डर करू शकाल आणि त्याची विक्री 28 जुलैपासून सुरू होईल. या इयरबड्सची किंमत जवळपास 15 हजार रुपये ठेवली जाऊ शकते.

अपडेट फिचर्स (Update Feature)
Google ने आपल्या इव्हेंट दरम्यान अनेक नवीन फीचर्स लाँच केले आहेत, Google Translate मध्ये 24 नवीन भाषा जोडल्या गेल्या आहेत. गुगल मॅप वापरून तुम्हाला ज्या मार्गांवर कमी गर्दी होईल ते मार्गही शोधता येतील, शहरे थ्रीडीमध्येही पाहता येतील. तुम्ही आता Google Meet वर देखील चांगल्या ऑडिओ आणि व्हिडिओ गुणवत्तेत कॉल प्राप्त करण्यास सक्षम असाल. मल्टीसर्च पर्याय वापरून, तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरील फोटोवर क्लिक करून त्या फोटोतील मजकूर आणि घटकांचे विश्लेषण करू शकाल.

सिक्युरिटी अपडेट्स (Security Updates)
गुगलकडून सिक्युरिटी अपडेट्सबद्दल अधिक प्रगत करण्यात आले आहेत. जर तुम्हाला कोणतीही जाहिरात आवडत नसेल तर तुम्ही ती कायमची काढून टाकू शकता. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही किरकोळ विक्रेत्यापासून तुमचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड तपशील प्रायव्हेट ठेवून पेमेंट करू शकता. यामुळे समोरच्या व्यक्तीपासून तुमच्या कार्डची माहिती गुपित राहील.

महत्त्वाच्या इतर बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget