एक्स्प्लोर

Google Doodle: 'द सन क्वीन' मारिया टेलकेस यांची 122वी जयंती; गूगलकडून खास डूडल

मारिया टेलकेस (Maria Telkes) यांनी सौर ऊर्जा क्षेत्रामध्ये विशेष योगदान दिलं. त्यांच्या सौर ऊर्जा क्षेत्रमधील कार्यामुळे त्यांना 'द सन क्वीन' असं संबोधलं जातं. 

Google Doodle On Maria Telke: सर्च इंजिन गूगलनं (Google) आज (12 डिसेंबर) एक खास डूडल तयार केलं आहे. आज द सन क्वीन अशी ओळख असणाऱ्या मारिया टेलकेस (Maria Telkes)  यांची 122 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त गूगलनं हे डूडल तयार केलं आहे. मारिया टेलकेस यांनी सौर ऊर्जा क्षेत्रामध्ये विशेष योगदान दिलं. त्यांच्या सौर ऊर्जा क्षेत्रमधील कार्यामुळे त्यांना 'द सन क्वीन' असं संबोधलं जातं. 

कोण आहेत मारिया टेलकेस? 

मारिया टेलकेस यांचा जन्म 12 डिसेंबर 1900 मध्ये बुडापेस्टमधील हंगेरी येथे झाला. 1920 मध्ये त्यांनी बी.ए.ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर 1924 मध्ये बुडापेस्ट विद्यापीठातून  मारिया टेलकेस यांनी पीएचडी केली.  मारिया यांनी  युनायटेड स्टेट्समध्ये जाऊन बायोफिजिस्ट (Biophysicist) म्हणून काम केले. 1937 मध्ये मारिया यांनी अमेरिकेचं नागरिकत्व मिळालं. त्यानंतर मारिया टेलकेस यांनी मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) मध्ये सौर ऊर्जा समितीच्या सदस्या म्हणून आपली कारकीर्द सुरू केली.  

दुसऱ्या महायुद्धादरम्यान,  त्यांना अमेरिकन सरकारने सौर डिस्टिलर विकसित करण्यास मदत करण्यासाठी बोलावले होते, ज्यामुळे समुद्राचे पाणी गोड्या पाण्यात बदलले. त्यावेळी हा जीवनरक्षक शोध पॅसिफिक थिएटरमध्ये तैनात असलेल्या सैनिकांनी वापरला होता.

MIT मध्ये काम करत असताना मॅसॅच्युसेट्सच्या एका प्रयोगामध्ये त्या सामील झाल्या. हा प्रयोग अयशस्वी झाला, तिला एमआयटीच्या सौर ऊर्जा संघातून काढून टाकण्यात आले. वास्तुविशारद एलेनॉर रेमंड यांच्यासोबत 1948 मध्ये  मारिया टेलकेस यांनी एक प्रणाली तयार केली जी सूर्यप्रकाशापासून भिंती गरम करू शकते. तसेच त्यांनी असा ओव्हन तयार केला, जो सौरऊर्जेवर चालू शकतो. तो सोलर ओव्हन लोक वापरत आहेत. या मारिया टेलकेस यांच्या संशोधनामुळे त्यांना 'द सन क्वीन'  म्हटलं जातं. त्यांच्याकडे 20 हून अधिक पेटंट आहेत. काही ऊर्जा कंपन्यांसाठी सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम केले. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Google Doodle Today: जगातील पहिले व्हिडीओ गेम कन्सोल बनवणाऱ्या गेराल्ड जॅरी लॉसन यांची जयंती; गूगलचं खास डूडल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
Uttam Jankar and Mohite Patil : 30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं,  चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं, चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Special Report Mahayuti : महायुतीत उमेदवारांचे गूढ, महायुतीचे उमेदवार अजूनही ठरेना!Narendra Modi Full Speech : 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; मराठी म्हणीतून काँग्रेसवर हल्लाNarendra Modi Wardha Speech : तडस - राणांसाठी नरेंद्र मोदींची सभा! वर्ध्यात घोषणांचा पाऊसMadha Lok Sabha : भाजपला माढ्यात मोठा धक्का! मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर एकत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
Uttam Jankar and Mohite Patil : 30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं,  चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं, चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
एमएस धोनी : तो आला, त्याने पाहिले, त्याने फिनिशिंग केली, लखनौच्या गोलंदाजांना चोपलं
एमएस धोनी : तो आला, त्याने पाहिले, त्याने फिनिशिंग केली, लखनौच्या गोलंदाजांना चोपलं
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
Embed widget