(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Google Chrome Update : जर तुम्ही Google Chrome वापरत असाल तर लवकर करा 'हे' काम, नाहीतर तुमचा डेटा हॅक होऊ शकतो
Google Chrome Update : तुमचं Google Chrome व्हर्जन अजूनही अपडेट केलं नसेल तर या बातमीकडे दुर्लक्ष करू नका. कारण गुगल क्रोमने 97.0.4692.99 नवीन व्हर्जन लॉन्च केलं आहे.
Google Realease Chrome Update : जर तुम्ही Google Chrome ब्राउझर वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. गुगलने Chrome वेब ब्राउझरचे नवीन व्हर्जन लॉन्च केले आहे. Google Chrome चे हे नवीन व्हर्जन 97.0.4692.99 एकूण 26 बग्सला (Bugs) दूर करेल. यापैकी, 16 बग्सला उच्च (High) म्हणून लिस्ट केले आहेत, तर 6 बग्स 'मध्यम' (Medium) म्हणून लिस्ट केले आहेत. सध्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टमसाठी हे नवीन अपडेट आले आहे. लवकरच त्याचे अपडेट मॅक ऑपरेटिंग सिस्टीम आणि लिनक्ससाठीसुद्धा अपडेट केले जाईल. अशा पद्धतीने तुम्ही हे नवीन व्हर्जन अपडेट करू शकता.
अपडेटनंतर हे बग्स (Bugs) निघून जातील
गुगलने नवीन व्हर्जन अपडेट करताना शेअर केलेल्या माहितीबरोबर, या अपडेटमधून कोणते बग्स काढले जातील हे देखील सांगितले आहे. Google ने सांगितले की, या आधीच्या व्हर्जनमध्ये CVE-2022-0289 काही त्रुटी आढळून आल्याने सायबर गुन्हेगारीचे धोके वाढण्याची शक्यता होती. यासाठीच कंपनीने सर्व यूजर्सना गुगल क्रोम अपडेट करण्यास सागितले आहे.
अशा प्रकारे नवीन व्हर्जन अपडेट करा
- तुमच्या स्मार्टफोन किंवा कंप्युटरमध्ये गुगल क्रोमसाठी ऑटोमॅटिक अपडेट चालू असल्यास, तुम्हाला आपोआप अपडेटचे नोटिफिकेशन मिळेल. जर ऑटोमॅटिक अपडेट सेटिंग चालू नसेल तर तुम्हाला आधी गुगल क्रोमच्या सेटिंगमध्ये जावे लागेल.
- यानंतर हेल्प सेक्शनमध्ये जाऊन About Google Chrome वर क्लिक करा.
- जर त्या ठिकाणी तुम्हाला 97.0.4692.99 लिहिलेले दिसत असेल तर ते नवीन व्हर्जन अपडेट झालं आहे. जर अपडेट नसेल तर लगेच अपडेट करून घ्या.
- कॉम्प्युटरवर अपडेट करण्यासाठी, ब्राउझरवर Chrome latest version डाऊनलोड करा आणि इन्टॉल करा.
- तुम्हाला मोबाइलवर अपडेट करण्यासाठी, प्ले स्टोअरवर जाऊन Google Chrome टाईप करा. नवीन व्हर्जन तुमच्यासमोर असेल त्याला अपडेट करू शकता.
महत्त्वाच्या बातम्या :
- अमेरिकेतील विमानतळावर सुरू झालेल्या 5जी सेवेचा विमानांच्या लँडिंगला अडथळा
- पुढल्या वर्षी देशातल्या प्रमुख शहरांना 5G नेटवर्कचं गिफ्ट!
- 5G नेटवर्कपासून बचाव करणारे प्रोडक्ट्सच हानिकारक, योग्य माहितीशिवाय वापरणं धोकादायक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha